नवी दिल्ली: करोना संकट असताना देखील आता एक एक करून क्रीडा स्पर्धांना सुरूवात होत आहे. सध्या झिम्बाब्वेचा संघ दौऱ्यावर आला आहे. दोन्ही संघातील पहिल्या वनडे सामन्यात पाकिस्तानने पाहुण्या संघाचा सहज २६ धावांनी पराभव केला. या सामन्यात पाकने विजय मिळवला असला तरी त्याचे चाहते संघाला ट्रोल करत आहे. जाणून घेऊयात काय आहे कारण... वाचा- झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या लढतीत विजय मिळवून पाकिस्तानने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पण या सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजांची रनिंग बिटविन द विकेट किती खराब आहे हे समोर आले. पाकिस्तान संघांच्या चाहत्यांसाठी हा प्रकार म्हणजे कोणत्या तरी जुन्या सामन्याचा अॅक्शन रिप्ले ठरला. वाचा- पाकिस्तानची फलंदाजी सुरू असताना इमाम-उल-हक ५८ धावांवर बाद झाला. तो ज्या पद्धतीने बाद झाला त्यावरून सोशल मीडियावर चाहत्यांनी पाक संघाचा चांगलाच समाचार घेतलाय. २५व्या षटकात पाचव्या चेंडूवर इमाम उल हकने चेंडू मारला आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला. इमामची नजर चेडंवरच होती तर दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या हॅरिस सोहेलने धाव घेतली. जेव्हा इमामने पाहिले सोहेल धाव पूर्ण करण्यासाठी येत आहे. तेव्हा दोन्ही फलंदाज एकाच क्रीजकडे धावले. या घटनेनंतर पाकिस्तानच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. वाचा- २०२० मध्ये देखील गोष्टी पाकिस्तानसाठी बदलल्या नाहीत चाहत्यांनी याआधीचे प्रसंग देखील शेअर केले
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34K6Yly
No comments:
Post a Comment