नवी दिल्ली: : भारतीय क्रिकेट संघाचा बहुप्रतिक्षित ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भारताचा संघ या दौऱ्यात चार कसोटी सामने आणि प्रत्येकी ३ सामन्यांची वनेड आणि टी-२० मालिका खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २७, २९ नोव्हेंबर आणि २ डिसेंबर रोजी वनडे सामने होतील. त्यानंतर ४,६ आणि ८ डिसेंबर रोजी टी-२० लढत होईल. कसोटी मालिकेची सुरूवात १७ डिसेंबरपासून होणार आहे. वाचा- कसोटी मालिका सुरू होण्याआधी भारत-ए आणि ऑस्ट्रेलिया-ए यांच्यात ६ ते ८ डिसेंबर रोजी एक सामना होईल. ११ ते १३ डिसेंबर दरम्यान सिडनीत डे-नाईट कसोटी मालिका होणार आहे. चार कसोटी सामन्यातील एडिलेड येथे होणारी कसोटी डे-नाइट असेल. तर बॉक्सिंग डे टेस्ट मॅच मेलबर्न मैदानावर होणार आहे. वाचा- असा आहे वनडे मालिका १) पहिली वनडे- २७ नोव्हेंबर, सिडनी २) दुसरी वनडे- २९ नोव्हेंबर, सिडनी ३) तिसरी वनडे- २ डिसेंबर, मानकुआ ओव्हल वाचा- टी-२० मालिका १) पहिली टी-२०: ४ डिसेंबर, मानकुआ ओव्हल २) दुसरी टी-२०: ६ डिसेंबर, सिडनी ३) तिसरी टी-२०: ८ डिसेंबर, सिडनी सराव लढती ६ ते ८ डिसेंबर- सराव सामना, ड्रमोनी ओव्हल, सिडन ११-१३ डिसेंबर- सराव सामना (डे-नाइड), सिडनी वाचा- कसोटी मालिका १) पहिली कसोटी- १७ ते २१ डिसेंबर, एडिलेड ओव्हल २) दुसरी कसोटी- २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न ३) तिसरी कसोटी- ७ ते ११ जानेवारी २०२१, सिडनी ४) चौथी कसोटी- १५ ते १९ जानेवारी, २०२१, गाबा
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37NRjTW
No comments:
Post a Comment