नवी दिल्ली: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करणे ही निवड समितीचे प्रमुख सुनील जोशी यांचे पहिले मोठे आव्हान होते. या संघ निवडीवरून आता वाद सुरू झालाय. संघातून काही नाव गायब झाली आहेत यामुळे निवड प्रक्रियेवर आणि दुखापत व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. माजी कर्णधार सुनिल गावस्कर यांनी देखील फिटनेस प्रकरणात पारदर्शकता आणण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केलय. वाचा- निवड समितीने सांगितले की, बीसीसीआयचे वैद्यकीय पथक रोहित शर्माच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहे. पण समिती पुढचा विचार करत आहे आणि लोकेश राहुलला टी-२० आणि वनडे मालिकेसाठी उपकर्णधार म्हणून निवडत आहे. याबाबत टाइम्स ऑफ इंडियाला मिळालेल्या माहितीनुसार, निवड समितीला टीम इंडियाचे फिजिओ नितिन पटेल यांनी सांगितले आहे की रोहित निवडीसाठी उपलब्ध नाही. विशेष म्हणजे त्यांनी रोहितच्या दुखापतीबाबत दुसरी कोणतीही माहिती दिली नाही. या वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंड दौऱ्यात रोहितला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती आणि तो माघारी आला होता. वाचा- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिट झाल्यास मुंबई इंडियन्सकडून पुन्हा एकादा आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकेल. जर तो आयपीएल खेळण्यासाठी फिट आहे तर तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी देखील उपलब्ध आहे. असे असताना केएल राहुलला उपकर्णधार का घोषित केले गेले? असा सवाल सर्वजण विचारत आहेत. वाचा- बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल. आशा करूया की दुखापत वाढू नये. त्यानंतरच निवड समिती निर्णय घेईल. भारतीय संघाची निवड झाल्यानंतर काही मिनिटात मुंबई इंडियन्सने रोहितचा नेटमध्ये सराव करत असतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. यावर सुनिल गावस्कर यांनी थेट हल्ला चढवला. जर तो मुंबई इंडियन्ससाठी नेटमध्ये सराव करत असेल तर मला वाटत नाही की त्याला कोणत्याही प्रकारची दुखापत आहे. दुखापतीबाबत अधिक पारदर्शकता आणण्याची गरज आहे. वाचा- जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे २०१९ हे वर्ष दुखापतीमुळे वाया गेले. या वर्षी आयपीएलमध्ये पाच सामन्यानंतर त्याला बाहेर जावे लागले. इशांत शर्मा देखील जखमी आहे. न्यूझीलंड दौऱ्यात तो जखमी झाला होता आणि एक मॅच खेळल्यानंतर दुखापतामुळे संघाबाहेर झाला. अशाच प्रकारची अडचण ऋषभ पंत बाबत आहे. त्याचा फॉर्म आणि फिटनेस या दोन्हीबद्दल समस्या आहेत. वाचा- न घ्या मधळ्या फळीतील सुर्यकुमार यादवने चांगली कामगिरी करून देखील त्याला संधी दिली गेली नाही. मनिष पांडे आणि हार्दिक पांड्या हे मॅच विनर ठरत आहेत. त्यामुळे यादवचा विचार झाला नाही. अक्षर पटेलने गोलंदाजी आणि फलंदाजीत चमक दाखवली आहे. पण त्याच्या ऐवजी वरुण चक्रवर्तीला टी-२० संघात स्थान मिळाले. पटेलची निवड झाली नाही कारण रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर आधीपासून संघात आहेत. चक्रवर्तीकडे विविधता असल्याने त्याला संधी मिळाल्याचे समजते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3kCNG74
No comments:
Post a Comment