आबुधाबी: सूर्यकुमार यादवने आतापर्यंत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. पण तरीही त्याला भारतीय संघाच देण्यात आलेले नाही. पण एकिकडे भारतीय संघाने नाकारलेल्या सूर्यकुमारपुढे एका देशाची ऑफर आली आहे. एका माजी परदेशी खेळाडूने सूर्यकुमार यादवने आपल्या देशाकडून खेळायला हवे, अशी ऑफर ठेवल्याचे पाहायला मिळत आहे. चांगली कामगिरी करूनही सूर्यकुमार यादवला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. पण त्याचवेळी न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक स्कॉट स्टायरिसने सूर्यकुमार यादवला न्यूझीलंडकडून खेळण्याची ऑफर दिल्याचे पाहायाला मिळत आहे. स्टायरिस यावेळी म्हणाला की, " जर सूर्यकुमार यादवला भारताकडून खेळण्याची संधी मिळत नसेल, तर त्याने विदेशी संघाचा विचार करायला हवा. यामध्ये स्टायरिस हे न्यूझीलंडचे नाव घ्यायलाही विसरले नाहीत." त्यामुळे आता भारतीय संघात स्थान न मिळाल्यामुळे सूर्यकुमार यादव न्यूझीलंडकडून खेळणार का, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. काल झालेल्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमारने झुंजार अर्धशतकी खेळी साकारली आणि निवड समितीला चांगलीच चपराक दिली होती. पण त्यानंतर रवी शास्त्री यांचे एक ट्विट चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे. रवी शास्त्री यांनी आपल्या ट्विटमध्येस 'सूर्या नमस्कार... तु, भक्कम आणि संयमी राहा....' या ट्विटनंतर रवी शास्त्री यांनी कुठेतरी सूर्यकुमारसाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडण्याची प्रक्रीया सुरु केली आहे, असे काही चाहत्यांना वाटत आहे. रवी शास्त्री यांचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादव यावेळी चांगलाच तळपल्याचे पाहायला मिळाले. मुंबईचे फलंदाज एका टोकाकडून बाद होत असताना सूर्यकुमारने झुंजार अर्धशतक साकारले आणि संघाला डाव सावरला. सूर्यकुमारच्या या धडाकेबाज खेळीच्या जोरावर मुंबईने आरसीबीच्या संघावर पाच विकेट्स राखून सहजपणे विजय मिळवला. आरसीबीने यावेळी मुंबईपुढे विजयासाठी १६५ धावांचे आव्हान ठेवले होते. सूर्यकुमारच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने हे आव्हान लीलया पेलले. सूर्यकुमारने यावेळी ४३ चेंडूंत १० चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद ७९ धावांची खेळी साकारली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35KLGDp
No comments:
Post a Comment