अबुधाबी: आयपीएलच्या १३व्या हंगामात आज शुक्रवारी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध ( ) यांच्यात लढत होणार आहे. पंजाब संघाने सलग पाच विजय मिळवत प्ले ऑफसाठीची मजबूत दावेदारी दाखल केली आहे. तर रॉयल्सला अस्तित्व टिकवण्यासाठी या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. आयपीएलच्या सुरुवातीला सातत्याने पराभव स्विकारणाऱ्या किंग्ज इलेव्हनने धडाकेबाज कामगिरी करत गेल्या पाच सामन्यात विजय मिळवला आहे. जो संघ काही सामन्यांपूर्वी आठव्या क्रमांकावर होता तो आता चौथ्या क्रमांकावर आहे. सध्या १२ सामन्यात त्यांचे १२ गुण झाले आहेत. तर राजस्थान रॉयल्स १२ सामन्यात १० गुणांसह ते सातव्या स्थानावर आहेत. वाचा- प्ले ऑफमध्ये फक्त एकच संघ क्वालिफाय झाला आहे. काल चेन्नईने कोलकाताचा पराभव करत मुंबई इंडियन्सला प्ले ऑफचे तिकीट मिळून दिले. आता अन्य तीन जागांसाठी खरी स्पर्धा आहे. जर आजच्या सामन्यात रॉयल्सचा पराभव झाला तर ते प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर होतील. या उलट जर पंजाबचा पराभव झाला तर त्यांच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या अडचणी वाढतील. वाचा- पंजाबचा कर्णधार केएल राहुल याने स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. ख्रिस गेल संघात आल्यापासून पंजाबने एकही सामना गमावलेला नाही. दुखापतीमुळे दोन सामन्यात खेळू न शकलेला मयांक अग्रवाल या सामन्यात खेळतो की नाही हे पाहावे लागले. मनदीप सिंहने कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध नाबाद ६६ धावा केल्या होत्या. ज्यामुळे त्यांना एक अतिरिक्त चांगला पर्याय भेटला. गोलंदाजीत मोहम्मद शमीच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी झाली आहे. दुसऱ्या बाजूला मुंबई इंडियन्सचा पराभव केल्याने राजस्थान रॉयल्सचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे. बेन स्टोक्स फॉर्ममध्ये असून त्याने मुंबई विरुद्ध नाबाद १०७ धावा केल्या होत्या. संजू सॅमसन गेल्या काही सामन्यातील अपयश विसरून पुन्हा चांगली फलंदाजी करतोय. पण कर्णधार स्टीव्ह स्मिथची खराब कामगिरी संघासाठी काळजीचा विषय आहे. जोफ्रा आर्चरने गोलंदाजीचा मोर्चा यशस्वीपणे सांभाळला आहे. त्याने १२ सामन्यात १७ विकेट घेतल्या आहेत. असे असेल तरी अन्य गोलंदाजांची कामगिरी चांगली झालेली नाही. या हंगामात दोन्ही संघात झालेल्या लढतीत राजस्थान रॉयल्सने विजय मिळवला होता. शारजामध्ये झालेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हनने दिलेले २२३ धावांचे आव्हान राजस्थानने पार केले होते. तेव्हा राहुल तेवतियाने स्फोटक खेळी केली होती. त्याने एका षटकात ५ षटकार मारले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3jKpNZQ
No comments:
Post a Comment