नवी दिल्ली: आयपीएल २०२०चा थरार युएईमध्ये सुरू आहे. ही स्पर्धा सुरू झाल्यापासून भारताचा माजी स्फोटक फलंदाज ( ) सोशल मीडियावर एक कार्यक्रम करतोय. () असे नाव असलेल्या कार्यक्रमात सेहवाग काल झालेल्या सामन्याचे पोस्टमार्टम आणि आज होणाऱ्या सामन्याबद्दल त्याची मते व्यक्त करत असतो. वाचा- या कार्यक्रमात विरेंद्रला एका चाहत्याने अनेक सामन्यात नंबर नसलेली जर्सी घालून का खेळायचा असा प्रश्न विचारला. यावर सेहवागने मजेदार उत्तर दिले. तो म्हणाला, मी जेव्हा पहिल्यांदा भारतीय वनडे संघाकडून खेळू लागले तेव्हा जर्सी नंबर ४४ मिळाला. पण माजी आई जेव्हा ज्योतिषाकडे गेली तेव्हा त्यांनी ४४ नंबर माझ्यासाठी योग्य नसल्याचे सांगितले आणि त्यांनी हा नंबर बदलण्यास सांगितले. नंतर जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा माजी पत्नीने सांगितले की ४४ नंबर लकी नाही तो बदला आणि तिने २ नंबर घेण्यास सांगितला. वाचा- आता जर्सीच्या नंबरवरून वाद नको यासाठी सेहवागने नंबरच घेतला नाही. तो म्हणाला, घरी सर्व खुश तर मी देखील खुश! या कार्यक्रमात सेहवागने त्याची वनडेमधील सर्वोत्तम खेळी ही न्यूझीलंडविरुद्ध झळकावलेले पहिले शतक असल्याचे सांगितले. या शतकामुळे मला ओळख मिळाल्याचे तो म्हणाला. वाचा- क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर सेहवाग सोशल मीडियावर सक्रीय आहे. त्याची क्रिकेटबद्दलची मते बिंदाधास्तपणे व्यक्त करत असतो. काही दिवसांपूर्वी सुर्यकुमार यादवला भारतीय संघात न घेण्यावरून देखील त्याने निवड समितीवर टीका केली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34GQQAW
No comments:
Post a Comment