Ads

Friday, October 30, 2020

धोनीच्या कौतुक यादीत पुण्याचा ऋतुराज गायकवाड, जाणून घ्या 'स्पार्क'राजबद्दल

नवी दिल्ली: आयपीएलचा १३वा हंगाम चेन्नई सुपर किंग्जसाठी आजवरचा सर्वात खराब असा ठरला. प्रत्येक हंगामात किमान प्ले ऑफमध्ये पोहोचणारा हा संघ या वर्षी मात्र गुणतक्त्यात अखेरच्या स्थानावर आहे. पण गेल्या दोन सामन्यात चेन्नईने विजय मिळवला आहे. या दोन्ही सामन्यात सुपर किंग्जने नव्या युवा खेळाडूंना संधी दिली आणि त्यांनी त्या संधीचे सोने केले. वाचा- राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर धोनीने संघातील युवा खेळाडूंमध्ये स्पार्क दिसत नसल्याचे म्हटले होते. त्याच्या विधानावर अनेकांनी टीका देखील केली होती. पण जेव्हा चेन्नईने युवा खेळाडूंना संधी दिली तेव्हा त्यांनी सामने जिंकून दिले. गेल्या दोन सामन्यात चेन्नईकडून अर्धशतकी खेळी करून विजय मिळून देणाऱ्या () चे सर्व जण कौतुक करत आहे. माजी क्रिकेटपटू, समालोचक आणि चाहते नव्हे तर खुद्द कर्णधार महेंद्र सिंह धोनीने त्याचे कौतुक केले. वाचा- ऋतुराज गायकवाड सर्वात दर्जेदार खेळाडू आहे असे धोनीने सामना झाल्यानंतर म्हटले. त्याला फलंदाजीची चांगली समज असल्याचे धोनी म्हणाला. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी करा. जाणून घ्या ऋतुराजबद्दल... शैलीदार फलंदाज असलेल्या ऋतुराजने १९ व्या वर्षी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २०१६-१७ मध्ये त्याची महाराष्ट्राच्या रणजी संघात निवड झाली. इंडिया ए कडून त्याने प्रथम श्रेणीत पदार्पण केले. २०१९ साली इंग्लंड लायन्स विरुद्ध तो खेळला होता. त्याची सुरुवात चांगली झाली नव्हती. तो गोल्डन डक म्हणजे पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद झाला होता. पण त्यानंतर ऋतुराजने करिअर योग्य दिशेने पुढे नेले. वाचा- भारत ए कडून खेळताना त्यांने श्रीलंका ए आणि वेस्ट इंडिज ए विरुद्ध ११२.८३च्या सरासरीने ६७७ धावा केल्या. त्याचा स्ट्रइक रेट ११६.७२ होता. ऋतुराजची धावसंख्या नाबाद ८७, नाबाद १२५ ९४, ८४,७४,३,८५, २० आणि ९९ अशी होती. ऑक्टोबर २०१८ साली देवधर ट्रॉफीत भारत ब संघात त्याची निवड झाली होती. डिसेंबर २०१८ झाली ते एमसीसीच्या एमर्जिंग टीममध्ये होता. करिअर डिसेंबर २०१८ साली चेन्नई सुपर किंग्जने २० लाखच्या बेस प्राइसवर ऋतुराजला विकत घेतले होते. पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. या हंगामात मिळालेल्या संधीचा त्याने भरपूर फायदा घेतला. आयपीएल सुरू होण्याआधी त्याला करोनाची लागण झाली होती. पण करोनावर मात करून फिट होऊन तो परत आला. आधी बेंगळुरू आणि मग कोलकाता विरुद्ध अर्धशतकी खेळी केली. पाच सामन्यात त्याने १४२ धावा केल्या आहेत. ऋतुराजचा जन्म ३१ जानेवारी १९९७ रोजी पुण्यात झाला. त्याचे वडील डीआरडीओमध्ये अधिकारी आहेत. तर आई शिक्षिका आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3oIdKjq

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...