दुबई: ट्रेंट बोल्ट आणि जसप्रित बुमराहने केलेल्या घातक गोलंदाजीमुळे महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्लीला केवळ १२० धावांवर रोखले. त्यानंतर इशान किशनच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने विजयाचे आव्हान सहज पार केले. या विजयासह मुंबईने गुणतक्त्यात १८ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे. प्ले ऑफसाठी मुंबईचा संघ हा क्रमांक एकवरच असेल. दिल्लीचा हा सलग चौथा पराभव आहे आणि साखळी फेरीतील अंतिम लढतीत त्यांना विजय मिळवणे गरजेचे आहे. वाचा- आजच्या सामन्यात देखील रोहित शर्मा शिवाय मुंबईचा संघ मैदानात उतरला होता. कर्णधार पोलार्डने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णय किती योग्य होता याचा प्रचिती पहिल्याच षटकात आली. बोल्टने शिखर धवनला शून्यावर बाद केले. गेल्या दोन सामन्यात संधी न दिलेल्या पृथ्वी शॉला या सामन्यात संघात स्थान दिले पण तो पुन्हा बेजबाबदारपणे बाद झाला. दोन बाद १५ वरून अय्यर आणि पंत यांनी दिल्लीची गाडी पुढे नेली खरी पण राहुल चाहरने अय्यरला बाद केले आणि मोठा अडथळा दुर केला. त्यानंतर स्टायोनिस, पंत, पटेल, हेटमायर आदींना मुंबईच्या गोलंदाजांनी झटपट माघारी पाठले. वाचा- मुंबईकडून जसप्रित बुमराहने १७ धावा देत ३ तर बोल्टने २१ धावा देत ३ विकेट घेतल्या. गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे दिल्लीला २० षटकात ९ बाद ११० धावा करता आल्या. वाचा- विजयासाठी १११ धावांचे किरकोळ लक्ष्य घेऊन आलेल्या मुंबईला इशान किशन आणि डीकॉक यांनी चांगली सुरूवात करुन दिली. डीकॉक २६ धावांवर बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादवसह इशान किशनने सहज विजय मिळून दिला. इशान किशनने नाबाद ७२ तर सूर्यकुमारने नाबाद १२ धावा केल्या. वाचा- या विजयासह मुंबई इंडियन्सने गुणतक्त्यात १८ गुणांसह अव्वल स्थान आणखी भक्कम केले आहे. प्ले ऑफमध्ये मुंबई संघाचे क्रमांक एकचे स्थान पक्के झाले आहे. दिल्लीचा आता फक्त एकच सामना शिल्लक आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे दोन सामने शिल्लक आहेत. या दोन्ही त्यांनी विजय मिळवला तरी नेट रनरेट मुंबईचा अधिक चांगला आहे. दिल्लीची पुढील लढत बेंगळुरूविरुद्ध असेल आणि त्यामध्ये विजय मिळवणे गरजेचे असेल. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3jLSk16
No comments:
Post a Comment