शारजा: विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये आज दुसरा सामना होणार आहे. दोन्ही संघ प्ले-ऑफच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असेल. या सामन्यासाठी दोन्ही संघात नेमके काय बदल होऊ शकतात, पाहा... हैदराबादच्या संघासाठी हा करो या मरो, असाच सामना असेल. कारण हा सामना गमावला तर त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. कारण सध्याच्या घडीला हैदराबादचा संघ हा गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहेत आणि त्यांचे १० गुण आहेत. हैदराबादचे आता १२ सामने झाले आहेत. त्यामुळे दोन सामन्यांमध्ये विजय मिळवल्यास त्यांचे १४ गुण होऊ शकतात. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवणे क्रमप्राप्त असेल. केन विल्यम्सन हा आता पूर्णपणे फिट झाला असून आजच्या सामन्यात तो खेळू शकतो, असे म्हटले जात आहे. त्यामुळे हैदराबादची मधली फळी चांगलीच भक्कम होऊ शकेल. वृद्धिमान साहा आणि डेव्हिड वॉर्नर यांनी गेल्या सामन्यात धमाकेदार फलंदाजी केली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात हैदराबादकडून कोणता फलंदाज चमकतो, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. आरसीबीच्या संघाला गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आजच्या सामन्यातही आरसीबीचा पराभव झाला तर त्यांचे प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न भंगू शकते. कारण सध्याच्या घडीला आरसीबीचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. जर आरसीबीच्या संघाचे असे पराभव होत राहिले, तर ते १४ गुणांवरच कायम राहतील. त्याचवेळी जर बऱ्याच संघाचे १४ गुण झाले तर रनरेटच्या जोरावर संघ प्ले-ऑफमध्ये पोहोचतील. यानंतरही आरसीबीचा एक सामना आहे. पण आजच्या सामन्यात जर त्यांनी विजय मिलवला तर नक्कीच त्यांचे प्ले-ऑफमधील स्थान जवळपास निश्चित होऊ शकते. आरसीबीच्या संघात आज काही बदल होऊ शकतात, असे म्हटले जात आहे. या सामन्यात नवदीप सैनी आणि इसुरु उडाला यांच्यापैकी एका खेळाडू संघात स्थान मिळेल. त्याचबरोबर या सामन्यात स्थान मिळवण्यासाठी मोईन अली आणि शिवम दुबे यांच्यामध्येही चांगली स्पर्धा पाहायला मिळेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2HMdjDQ
No comments:
Post a Comment