Ads

Thursday, October 29, 2020

IPL 2020: राणा दा जिंकलंस... नितिशच्या अर्धशतकाच्या जोरावर केकेआरचे चेन्नईपुढे मोठे आव्हान

आबुधाबी: नितिश राणाने यावेळी धडाकेबाज फलंदाजी करत सर्वांचीच मने जिंकून घेतली. कोलकाता नाइट रायडर्सचे फलंदाज एकामागून एक अपयशी ठरत असताना राणाने झुंजार अर्धशतकी खेळी साकारली. राणाच्या या दमदार खेळीच्या जोरावरच केकेआरला चेन्नई सुपर किंग्सपुढे १७३धावांचे आव्हान ठेवता आले. राणाने या सामन्यात ६१ चेंडूंत १० चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ८७ धावांची धमाकेदार खेळी साकारली. चेन्नईच्या संघाने यावेळी नाणेफेक जिंकून केकेआरला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. केकेआरच्या शुभमन गिल आणि नितिश राणा यांनी दमदार फलंदाजी करत पहिल्या पॉवर प्लेमध्ये ४२ धावा केल्या. पण पहिल्या पॉवर प्लेनंतर चित्र थोडेसे बदलले पाहायला मिळाले. कारण त्यानंतर चेन्नईचा फिरकीपटू कर्ण शर्माने गिलला बाद करत संघाला पहिले यश मिळवून दिले. गिलने यावेळी १७ चेंडूंत चार चौकारांच्या जोरावर २६ धावा केल्या. गिल बाद झाल्यावर सुनिल नरिनला यावेळी तिसऱ्या स्थानावर बढती देण्यात आली होती. पण याचा फायदा नरिनला उचलता आला नाही. कारण नरिनला यावेळी फक्त सात धावांवर समाधान मानावे लागले. केकेआरने फलंदाजीमध्ये यावेळी अजून एक धक्का दिला. कारण नरिन बाद झाल्यावर दिनेश कार्तिक फलंदाजीला येईल, असे सर्वांना वाटत होते. पण केकेआरने यावेळी रिंकू सिंगला बढती दिली. पण रिंकूलाही या गोष्टीचा फायदा उचलता आला नाही. रिंकूला यावेळी ११ धावा करता आल्या. एकाबाजूने दोन फलंदाज बाद होत असले तरी दुसऱ्या बाजूने नितिष राणा हा चेन्नईच्या गोलंदाजांवर चांगलाच प्रहार करत असल्याचे पाहायला मिळाले. राणाने यावेळी धमाकेदार फटकेबाजी करत अर्धशतक साकारले. त्याचबरोबर चेन्नईच्या कर्ण शर्माच्या १६व्या षटकात सलग तीन षटकार लगावून आपली गुणवत्ता पुन्हा एकदा दाखवून दिली. पण राणाचा अपवाद वगळता अन्य केकेआरच्या अन्य फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नाही. पण राणाने यावेळी ८७ धावांची दिमाखदार खेळी साकारली. गेल्या सामन्यात राणाला भोपळाही फोडता आला नव्हता. पण आजच्या सामन्यात राणाने ही कसरदेखील भरून काढली.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34BFv5o

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...