आबुधाबी: महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडने या सामन्यातही धडाकेबाज अर्धशतक साकारले. हे त्याचे सलग दुसरे अर्धशतक ठरले. ऋतुराजच्या या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने केकेआरवर सहा विकेट्स राखून मोठा विजय साकारला. अखेरच्या षटकांमध्ये रवींद्र जडेजाना धमाकेदार फटकेबाजी करत चेन्नईसाठी विजय खेचून आणला. जडेजाने सलग दोन षटकार लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ऋतुराजने यावेळी ५३ चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ७२ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. जडेजाने यावेळी ११ चेंडूंत २ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद ३१ धावांची तुफानी खेळी साकारली. केकेआरच्या १७३ धावांचा पाठाग करताना चेन्नईच्या संघाने चांगली सुरुवात केली. चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडने यावेळी संयत सुरुवात केली. पण स्थिरस्थावर झाल्यावर मात्र ऋतुराजने मुक्तपणे फटकेबाजी करत चाहत्यांना मनमुराद आनंद दिला. चेन्नईचा दुसरा सलामीवीर शेन वॉटसनला मात्र यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही. केकेआरचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने यावेळी वॉटसनला बाद करत चेन्नईला पहिला धक्का दिला. वॉटसनला यावेळी १४ धावांवर समाधान मानावे लागले. वॉटसन बाद होण्यापूर्वी चेन्नईने आपले अर्धशतक पूर्ण केले होते. वॉटसन बाद झाल्यावर अंबाती रायुडू फलंदाजीला आला. यावेळी ऋतुराज आणि रायुडू यांची जोडी यावेळी चांगलीच जमलेली पाहायला मिळाली. ऋतुराज आणि रायुडू यांनी यावेळी केकेआरच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. ऋतुराजने यावेळी ३७ चेंडूंत आपले अर्धशतक साजरे केले. ऋतुराजचे हे सलग दुसरे अर्धशतक ठरले. गेल्या सामन्यात आरसीबीबरोबरही ऋतुराजने अर्धशतक झळकावले होते. ऋतुराज आणि रायुडू यांनी यावेळी दुसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. मोठा फटका मारण्याच्या नादात रायुडू यावेळी बाद झाला, त्याला केकेआरच्या पॅट कमिन्सने बाद केले. रायुडूने फक्त २० चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३८ धावांची खेळी साकारली. रायुडू बाद झाल्यावर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा फलंदाजीला आला. गेल्या सामन्यात ऋतुराज आणि धोनी यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले होते. पण या सामन्यात मात्र धोनीला ऋतुराजला चांगली साथ देता आली नाही. धोनीला यावेळी केकेआरच्या चक्रवर्तीने त्रिफळाचीत केले. धोनीला यावेळी फक्त एकच धाव करता आली. मोक्याच्या क्षणी यावेळी ऋतुराज बाद झाल्याचे पाहायला मिळाले. मोठा फटका मारण्याच्या नादात ऋुतुराज यावेळी बाद झाला
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3kGY3GK
No comments:
Post a Comment