नवी दिल्ली: संघाची २०२० मधील कामगिरी फार खराब झाली. या खराब कामगिरीमागे कर्णधार महेंद्र सिंह धोनीचे फॉर्ममध्ये नसने हे देखील तितके जबाबदार होते. जर धोनीने त्याच्या जीवावर एक किंवा दोन सामन्यात विजय मिळून दिला असता तर चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीत आज देखील असती. प्रत्यक्षात तसे झाले नाही. धोनीने खुप प्रयत्न केले, पण यश आले नाही आणि संघ देखील खराब कामगिरी करत गेला. चेन्नई आयपीएल २०२० मधून बाहेर गेला असला तरी गेल्या काही सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. वाचा- धोनीच्या खराब फॉर्म मागचे कारण जुलै २०१९ नंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेट मधून दूर झाला होता. सामन्याचा सराव नसल्याने मैदानावर चांगली कामगिरी करू शकला नाही. आता पुढील सहा महिन्यांनी धोनी पुन्हा मैदानावर येणार आहे. तेव्हा निमित्त असेल आयपीएल २०२१चे. अशात श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने धोनीने पुढील आयपीएलच्या आधी फॉर्ममध्ये येणे गरजेचे असल्याचे सांगितले. वाचा- संगकारा म्हणाला, २०२१च्या आयपीएलमध्ये फॉर्ममध्ये यायचे असेल तर धोनीला क्रिकेट खेळावे लागले. तुमच्याकडे फॉर्ममध्ये परत येण्यासाठी एक सीझन अथवा एक मालिका असते आणि त्यात तुम्ही लय मिळू शकता. धोनीच्या फॉर्मने संघाला देखील कोड्यात टाकले आहे. धोनीचा फॉर्म ही एक अशी गोष्ट आहे ज्या बाबत तुम्ही अपेक्षा ठेवू शकता. वाचा- धोनीचे करिअर अंतिम टप्प्यात आहे. पण याचा अर्थ हा नव्हे की त्याच्यात काही कमी किंवा चेन्नईसाठी त्याचे महत्त्व कमी झाले आहे. हा एक असा टप्पा आहे ज्यातून त्याला बाहेर पडावे लागले. मला निश्चितपणे असे वाटते की, धोनीला खेळत राहण्याची इच्छा आहे. पण तो चांगली कामगिरी देखील करू शकतो. धोनीबाबत सर्वांनाच माहिती आहे की त्याच्या एका अर्धशतकापेक्षा तो संघाला विजय मिळून देण्यास प्राधान्य देतो.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mugcZ4
No comments:
Post a Comment