नवी दिल्ली: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड काही दिवसांपूर्वी करण्यात आली. या संघात मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या सुर्यकुमार यादवची निवड होईल अशी आशा होती. पण त्याला संधी मिळू शकली नाही. या निवडीनंतर सूर्यकुमार यादवने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध धमाकेदार अर्धशतकी खेळी केली. या सामन्यात विराट कोहलीने सुर्यकुमार यादव सोबत अशी एक कृती केली ज्यावर सर्वजण टीका करत आहेत. वाचा- बुधवारी २८ ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्सने २० षटकात ६ बाद १६४ धावसंख्या उभी केली. धावांचा पाठलाग करताना मुंबईने १९.१ षटकात ५ विकेटच्या बदल्यात विजय मिळवला. सूर्यकुमार यादवने ४३ चेंडूत नाबाद ७९ धावांची खेळी केली आणि मुंबईला विजय मिळून दिला. मुंबईच्या फलंदाजी दरम्यान असे काही पाहायला मिळाले ज्याची विराट कोहलीकडून अपेक्षा नव्हती. वाचा- या सामन्यात डेल स्टेन १३व्या षटक टाकत होता. या षटकातील अखेरच्या चेंडूवर सूर्यकुमारने एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मारला. कोहलीने हा चेंडू थांबवला आणि त्यानंतर तो सरळ सूर्यकुमारकडे पाहत चालत आला. सुर्यकुमार देखील त्याच्याकडे पाहत होता. कोहलीला सूर्यकुमारवर दबाव टाकायचा होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर स्पष्टपणे दिसते की सूर्यकुमार स्लेजिंग करत होता. अर्थात दोन्ही खेळाडूंमध्ये कोणतीही शब्दिक देवाणघेवाण झाली नाही. कोहलीच्या या वागण्याचा सूर्यकुमारवर काही परिणाम झाला नाही. वाचा- विराट चेंडू घेऊन जवळ आला आणि त्याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण ही गोष्ट अनेक चाहत्यांना आवडली नाही. अनेकांनी एकच प्रतिक्रिया दिली आहे की, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार या नात्याने त्याने कोणत्याही खेळाडूसोबत असे करणे चुकीचे आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35RpQ10
No comments:
Post a Comment