Ads

Thursday, October 29, 2020

IPL 2020: सूर्यकुमारला मिळू शकते का भारतीय संघात स्थान? पाहा प्रशिक्षक रवी शास्त्री काय म्हणाले...

आबुधाबी: मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादव हा चांगल्या फॉर्मात आहे. गेल्या २-३ आयपीएलपासून सूर्यकुमार सातत्याने चांगली फलंदाजी करताना दिसत आहे. त्यामुळे यावेळी जेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारतीय संघात सूर्यकुमारने नाव दिसले नाही तेव्हा चाहते चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले होते. पण यावेळी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सूर्यकुमार एक सल्ला दिल्याचे पाहायला मिळाले आहे. काल झालेल्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमारने झुंजार अर्धशतकी खेळी साकारली आणि निवड समितीला चांगलीच चपराक दिली होती. पण त्यानंतर रवी शास्त्री यांचे एक ट्विट चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे. रवी शास्त्री यांनी आपल्या ट्विटमध्येस 'सूर्या नमस्कार... तु, भक्कम आणि संयमी राहा....' या ट्विटनंतर रवी शास्त्री यांनी कुठेतरी सूर्यकुमारसाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडण्याची प्रक्रीया सुरु केली आहे, असे काही चाहत्यांना वाटत आहे. रवी शास्त्री यांचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादव यावेळी चांगलाच तळपल्याचे पाहायला मिळाले. मुंबईचे फलंदाज एका टोकाकडून बाद होत असताना सूर्यकुमारने झुंजार अर्धशतक साकारले आणि संघाला डाव सावरला. सूर्यकुमारच्या या धडाकेबाज खेळीच्या जोरावर मुंबईने आरसीबीच्या संघावर पाच विकेट्स राखून सहजपणे विजय मिळवला. आरसीबीने यावेळी मुंबईपुढे विजयासाठी १६५ धावांचे आव्हान ठेवले होते. सूर्यकुमारच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने हे आव्हान लीलया पेलले. सूर्यकुमारने यावेळी ४३ चेंडूंत १० चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद ७९ धावांची खेळी साकारली. सुर्यकुमार हा सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याचा संघात समावेश न केल्याबद्दल मी निराश झालो आहे. तो देशातील एक चांगला फलंदाज आहे, असे वेंगसरकर म्हणाले, "क्षमतेचा प्रश्न असेल तर सुर्यकुमारची तुलना मी भारतीय संघातील सर्वोत्तम खेळाडूशी करू शकतो. त्याने सातत्याने धावा केल्या आहेत. मला माहिती नाही की भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी आणखी काय करावे लागते." एका मुलाखतीत वेंगसरकरांनी भारतीय संघातील क्रिकेटपटूसोबत सुर्यकुमारची तुलना केली आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीकडे मागणी केली की, या खेळाडूला संघात का घेतले नाही याची चौकशी केली जावी.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3e5hxmd

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...