Ads

Tuesday, October 27, 2020

IPL 2021: पाहा धोनी बद्दल चेन्नईचे सीईओ काय म्हणाले...

चेन्नई: () संघासाठी या वर्षी आयपीएल (IPL) मधील कामगिरी अत्यंत खराब झाली. या संघाना आतापर्यंत जेव्हा जेव्हा आयपीएलमध्ये भाग घेतला तेव्हा त्यांनी नेहमची प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. पण या वर्षी प्रथमच चेन्नई प्ले ऑफमध्ये दिसणार नाही. रविवारी राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला आणि चेन्नई आयपीएलच्या प्ले ऑफमधून बाहेर पडली. हा संघ सध्या गुणतक्त्यात अखेरच्या स्थानावर आहे. वाचा- संघातील सिनिअर खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. स्वत: कर्णधार ( ) ची बॅट शांत होती. त्याने १२ सामन्यात १९९ धावा केल्या. स्ट्राइक रेट ११८.४५ इतका होता. आयपीएलचा पुढील हंगाम ६ महिने दूर आहे. धोनीचे वय ३९ आहे. अशात त्याच्या भविष्याच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वाचा- भारताचा माजी कर्णधार धोनी कधीच भविष्यातील नियोजन उघड करत नाही. पण चेन्नई सुपर किंग्ज संघाचे सीईओ () यांनी धोनीच हाच CSKचा २०२१च्या आयपीएलसाठीचा कर्णधार असेल असे म्हटले आहे. वाचा- 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना विश्वनाथन म्हणाले, नक्कीच मला पूर्ण विश्वास आहे की धोनीच २०२१ मध्ये सुपर किंग्जचे नेतृत्व करेल. त्याने आमच्यासाठी तीन विजेतेपद मिळून दिली आहेत. पहिल्यांदा आम्ही प्ले ऑफमध्ये पोहोचू शकलो नाही. अन्य कोणत्याही संघाने अशी कामगिरी केली नाही. एक वर्ष खराब गेले म्हणून सर्व काही बदलण्याची गरज आम्हाला वाटत नाही. या वर्षी आमच्या क्षमतेनुसार कामगिरी झाली नाही. जे सामने जिंकायचे होते त्यात आमचा पराभव झाला. त्यामुळे आम्ही मागे पडलो. सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी माघार घेतली आणि करोनामुळे संघाचे संतुलन बिघडले. वाचा- २०२१ साली धोनीच नेतृत्व करेल पण पुढच्या हंगामात संघ नवा असेल. कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी याआधची म्हटले होती की, संघात बदल आवश्यक आहेत. येणाऱ्या हंगामासाठी जर मोठा लिलाव होणार ही नाहीय यावर सुरेश रैना, हरभजन सिंग, केदार जाधव आणि पियूष चावला सारखे खेळाडू संघात असतील की नाही हे ठरेल. रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध चेन्नईने युवा खेळाडूंना संधी दिली होती आता उर्वरित दोन सामन्यात देखील युवा खेळाडूंना संधी दिली जाणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2G2Whkh

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...