Ads

Tuesday, October 27, 2020

IPL: फक्त 'या' एका गोष्टीमुळे किंग्ज इलेव्हनचे नशिब बदलले

नवी दिल्ली: आयपीएलच्या १३व्या हंगामातील पहिल्या सत्रात संघ अखेरच्या म्हणजे आठव्या स्थानावर होता. पहिल्या सात पैकी त्यांना फक्त एका सामन्यात विजय मिळवता आला होता. पण आता तो संघ गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर पोहोचला असून प्ले ऑफमधील चौथ्या स्थानासाठीचा तो मजबूत दावेदार मानला जातोय. काल सोमवारी किंग्ज इलेव्हन पंजाबने कोलकाता नाइट रायडर्सचा पराभव करत सलग पाचव्या विजयाची नोंद केली. पंजाब संघात हा अचानक बदल कसा काय झाला, असा प्रश्न अनेकांना पडत आहे. गेल्या पाच सामन्यात पंजाबने संघात एक बदल केला आहे. हा बदल त्यांच्यासाठी लकी ठरतोय. वाचा- गेल्या पाच सामन्यापासून पंजाब संघाकडून युनिवर्सल बॉस अर्थात (किंग्ज इलेव्हन पंजाब ) खेळत आहे. गेलचा अंतिम ११ मध्ये समावेश केल्यापासून पंजाबने एकही सामना गमावलेला नाही. गेलने ५ सामन्यात १७७ धावाकेल्या आहेत. ही त्याची सर्वोत्तम कामगिरी नसली तरी जो संघ आठव्या क्रमांकावर होता आणि आयपीएलमधील त्यांचे आव्हान संपुष्ठात आले असते तो आता प्ले ऑफमधील चौथ्या स्थानाचा मुख्य दावेदार झाला आहे. वाचा- आयपीएलमधील गेल असा एक खेळाडू आहे ज्याची फलंदाजी पाहण्याची इच्छा प्रत्येक भारतीय चाहत्याला असते. त्याच बरोबर गेलची पर्सनल लाइफ देखील लोकांना आकर्षित करत असते. सोमवारी KKR विरुद्ध त्याने २९ चेंडूत ५१ धावा केल्या आणि पंजाबला सलग पाचवा विजय मिळून दिला. या विजयानंतर किंग्ज इलेव्हनने एक ट्विट शेअर केला आहे. यात ते म्हणतात, शेर की उम्र ज्यादा है लेकिन बुड्ढा नहीं हुआ अभी तक। वाचा- गेल मैदानात पळून धावा करत नाही तर त्याच्या बॅटमधून चौकार आणि षटकाराने अधिक धावा निघतात. टी-२० त्याने आतापर्यंत १३ हजार ३४९ धावा केल्या आहेत. त्यापैकी १० हजार धावा फक्त चौकार आणि षटकाराने आल्या आहेत. टी-२० मध्ये चौकार आणि षटकाराने १० हजार धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. आतापर्यंत ४०५ टी-२० सामने खेळणाऱ्या गेलने ९८३ षटकार आणि १ हजार २७ चौकार मारले आहेत. वाचा- आयपीएलच्या सुरुवातीला गेल कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळायचा २०११ साली तो रॉयल चॅलेंजर्सकडे आला, २०१८ पासून तो किंग्ज इलेव्हनकडून खेळतोय. IPL मध्ये त्याने ३२६ षटकार मारले आहेत तर ४ हजार ४८४ धावा केल्या आहेत. २०१३ साली गेलने असा एक विक्रम केला आहे जो आजपर्यंत मोडला गेला नाही. त्याने पुणे वॉरियर्स विरुद्ध १३ चौकार आणि १७ षटकारांसह नाबाद १७५ धावा केल्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37KreFp

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...