दुबई : कोलकाता नाइट रायडर्सची या सामन्यात ३ बाद १० अशी अवस्था झाली होती. पण यावेळी सलामीवीर शुभमन गिलने झुंजार अर्धशतक झळकावत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्याता मोलाचा वाटा उचलला. गिलने यावेळी कर्णधार इऑन मॉर्गनबरोबर चौथ्या विकेटसठी ८१ धावांची महत्वपूर्ण भागीदारीही रचली. त्यामुळे कोलकाताला पंजाबपुढे १५० धावांचे आव्हान ठेवता आले. गिलने यावेळी ४५ चेंडूंत तीन चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ५७ धावांची दमदार खेळी साकारली. पंजाबने यावेळी नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा हा निर्णय योग्य असल्याचे गोलंदाजांनी दाखवून दिले. कारण पहिल्याच षटकात पंजाबच्या ग्लेन मॅक्सवेलने यावेळी गेल्या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या नितिश राणाला बाद केले. राणाला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. पंजाबचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने यावेळी दुसऱ्याच षटकात पंजाबला दोन धक्के दिल्याचे पाहायला मिळाले. शमीने यावेळी चौथ्या चेंडूवर राहुल त्रिपाठीला बाद केले. राहुलला यावेळी सात धावांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर शमीने या षटकाच्या सहाव्या चेंडूवर दिनेश कार्तिकलाही तंबूचा रस्ता दाखवला. कार्तिकला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. कोलकाताची यावेळी ३ बाद १० अशी दयनीय अवस्था झाली होती. पण त्यानंतर शुभमन गिल आणि कर्णधार इऑन मॉर्गन यांनी संघाला सावरले. या दोघांनी पंजाबच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार केला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी यावेळी ८१ धावांची भागीदारी रचून संघाला सुस्थितीत आणले. पण पंजाबचा फिरकीपटू रवी बिश्नोईने ही जोडी फोडली. रवीने यावेळी मॉर्गनला बाद केले आणि संघाला मोठे यश मिळवून दिले. मॉर्गनने यावेळी २५ चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ४० धावांची धडाकेबाज खेळी साकारली. मॉर्गन बाद झाल्यावर कोलकाताच्या धावसंख्येचा वेग कमी झाला. पण यावेळी गिलनने झुंजार फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. गिलच्या या अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोलकाताला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. गिलने अखेरच्या फलंदजांना आपल्या साथीला घेतले आणि संघाला चांगली धावसंख्या उभारुन देण्यात मोलाची कामगिरी केली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3kyYov6
No comments:
Post a Comment