दुबई : ऑस्ट्रेलियाच्या आगामी दौऱ्यासाठी भारताचे तिन्ही संघ जाहीर करण्यात आले आहेत. पण सर्वात महत्वाची बातमी म्हणजे या तिन्ही संघांमध्ये रोहित शर्माला स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे रोहितच्या चाहत्यांसाठी हा एक मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आज युएईमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी निवड समितीचे अध्यक्ष सुनील जोशी यांच्याशी चर्चा करून हा संघ निवडवण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी निवडवण्यात आलेल्या संघांमध्ये नवदीप सैनी आणि वरुण चक्रवर्ती यांनाही स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही युवा खेळाडूंसाठी ही चांगली संधी असेल, असे म्हटले जात आहे. भारताचा संघ ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यांच्या मालिका खेळणार आहे. पण या तिन्ही संघांत रोहितबरोबर वेगवान गोलंदाज इशांत शर्मा या दोघांना यावेळी स्थान देण्यात आलेली नाही. बीसीसीआयचा वैद्यकीय चमू या दोघांच्या दुखापतींवर लक्ष ठेवून आहे. सध्याच्या घडीला रोहित आणि इशांत यांना आयपीएलमध्ये दुखापत झाल्याचे आपण पाहिले आहे. त्यामुळे या दोघांचा विचार आज भारतीय संघ निवडताना विचार केलेला नाही. रोहित आणि इशांत दुखापतीमधून कसे सावरतात आणि कधी पूर्णपणे फिट होतात, याकडे बीसीसीआय लक्ष ठेवून असेल. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी रोहित आणि इशांत यांचा विचार ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या संघात करण्यात आलेला नाही. या भारताच्या संघात काही युवा खेळाडूंनाही स्थान देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. भारताच्या ट्वेन्टी-२० संघात कोलकाता नाइट रायडर्सच्या वरुण चक्रवर्तीला स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर आरसीबीचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीलाही भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर भारतीय संघाबरोबर टी. नटराजन, कार्तिक त्यागी, इशान पोरेल आणि कमलेश नागरकोटी या युवा खेळाडूंनाही ठेवण्यात आले आहे. सध्याच्या घडीला करोना जगभरात आहे, त्याचबरोबर कोणत्या खेळाडूंना दुखापत झाली तर या युवा खेळाडूंना भारताकडून खेळण्याची संधी मिळू शकते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3opRwCK
No comments:
Post a Comment