दुबई : दिल्ली कॅपिटल्सिविरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या रशिद खानने विक्रम रचल्याचे पाहायला मिळाले. या आयपीएलमध्ये रशिद खानसारखी कामगिरी कोणालाही करता आली नाही. आजच्या सामन्यात रशिदने चार षटकांमध्ये फक्त सात धावा देत तीन फलंदजांना बाद केले. त्याचबरोबर त्याच्या चार षटकांमध्ये तब्बल १७ चेंडू निर्धाव गेल्याचे पाहायला मिळाले. आतापर्यंत अशी दमदार कामगिरी या आयपीएलमध्ये एकाही गोलंदाजाला करता आलेली नाही. या सामन्यात रशिदने सातव्या षटकात दिल्लीच्या संघाला दोन धक्के दिल्याचे पाहायला मिळाले. रशिदने सहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शिमरॉन हेटमायरला बाद केले. हेटमायरला त्रिफळाचीत करत रशिदने आपला पहिला बळी मिळवला. त्यानंतर या सहाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर स्थिरस्थावर झालेल्या अजिंक्य रहाणेला बाद केले. रशिदने अजिंक्यला यावेळी पायचीत पकडले. अजिंक्यला यावेळी २६ धावा करता आल्या. रशिदने त्यानंतर आपला तिसरा बळी मिळवला. रशिदने यावेळी अक्षर पटेलला बदली खेळाडू प्रियम गर्गकरवी झेलबाद केले. अक्षरला यावेळी फक्त एका धावेवर समाधान मानावे लागले. रशिदने या सामन्यात तीन महत्वाच्या विकेट्स तर मिळवल्याच, पण त्याचबरोबर चार षटकांमध्ये फक्त सात धावाच दिल्या. त्याचबरोबर १७ चेंडू यावेळी निर्धावही टाकली. त्यामुळे आजच्या सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनीच फक्त चांगली कामगिरी केली नाही, तर रशिदने भेदक मारा करत संघा्च्या विजयात आपलेही मोलाचे योगदान दिले. हैदराबादच्या फलंदाजांपुढे आज दिल्लीच्या गोलंदाजांनी लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले. वृद्धिमान साहा आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नर यांनी तुफानी फटकेबाजी करत दिल्लीच्या तोंडचे पाणी पळवल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक सहा अर्धशतके आता वॉर्नरच्या नावावर झाली आहेत. वॉर्नर आणि साहा यांनी केलेल्या जबरदस्त फटकेबाजीमुळे ़हैदराबादला दिल्लीपुढे २२० धावांचे तगडे आव्हान ठेवता आले. वॉर्नर आणि साहा यांनी यावेळी तुफानी फटकेबाज करत आपली अर्धशतकेही पूर्ण केली. वॉर्नरने यावेळी ६६ धावांची झंझावाती खेळी साकारली, तर साहाने ८७ धावांचा तुफानी खेळी केली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34vDLKU
No comments:
Post a Comment