दुबई: IPL 2020 आयपीएलच्या १३व्या हंगामात आज मंगळवारी आणि यांच्यात लढत होणार आहे. गेल्या दोन सामन्यात दिल्लीचा पराभव झाला होता. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून प्ले ऑफमधील स्थान निश्चित करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. वाचा- कोलकाता नाइड रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबकडून पराभव झाल्याने दिल्ली अद्याप १४ गुणांवर अडकली आहे. आज विजय मिळून १६ गुणांसह प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. या दोन्ही संघातील लढतींचा विचार केल्यास सनरायजर्स १० विरुद्ध ६ ने पुढे आहे. वाचा- एका बाजूला दिल्लीला प्ले ऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी एका विजयाची गरज आहे तर दुसऱ्या बाजूला हैदराबादकडे ११ सामन्यातील ४ विजयांसह फक्त ८ गुण आहेत. ते गुणतक्त्यात सातव्या स्थानावर आहेत. त्यांचे प्लेऑफमध्ये पोहोचणे जर आणि तर वर अवलंबून आहे. या पुढील सर्व सामने जिंकल्यानंतर देखील त्यांना अन्य संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागणार आहे. दिल्लीकडे आक्रमक फलंदाजी आणि तगडी गोलंदाजी आहे. हा संघ एका खेळाडूवर अवलंबून नाही. पण गेल्या ३ सामन्यात शिखर धवन वगळता अन्य फलंदाजांना चांगली कामगिरी करता आलेली नाही. चेन्नई विरुद्ध शतक केल्यानंतर शिखरने पंजाब विरुद्ध देखील धमाकेदार खेळी केली. तरी त्यांचा पराभव झाला. कोलकाताविरुद्ध १९५ धावांचा पाठलाग करताना त्यांना १३५ धावा करता आल्या. खराब कामगिरी केली म्हणून पृथ्वीला बाहेर बसलवेल. पण त्याच्या जागी आलेल्या अजिंक्य रहाणेला भोपळा फोडता आला नाही. ऋषभ पंत आणि शिमरॉन हेटमायर देखील धावा करू शकले नाहीत. गोलंदाजीत रबाडा आणि एनरिक नोर्जे यांनी चांगली कामगिरी केली आहे. अक्षर पटेल देखील चांगली गोलंदाजी करतोय. पण तुषार देशपांडे आणि आर.अश्विन यांच्याकडून चुका होत आहेत. हैदराबादबद्दल बोलायचे झाले तर किंग्ज इलेव्हन विरुद्ध १२७ धावांचे लक्ष्य पार करता आले नाही. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो बाद झाल्यानंतर मॅच बदलली. त्यांनी अखेरच्या २ षटकात पाच विकेट गमवला आणि लाजिरवाणा पराभव स्विकारला होता. याआधी दोन्ही संघात झालेल्या सामन्यात हैदराबादने दिल्लीचा पराभव केला होता, हीच गोष्टी त्यांच्यासाठी दिलासा देणारी ठरेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35CoSFV
No comments:
Post a Comment