शारजा: मुंबई इंडियन्सला आजच्या सामन्यापूर्वी एक मोठा धक्का बसू शकतो, असे म्हटले जात आहे. आजच्या चेन्नईविरुद्धच्या सामन्याला मुंबईचा कर्णधार मुकण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरु आहे. ही चर्चा खरी असली तर मुंबईला हा मोठा धक्का असेल. पण आजच्या सामन्याच्या नाणेफेकीच्यावेळी सर्व चित्र स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे सर्वांनाच आता मुंबई आणि चेन्नई यांच्यातील नाणेफेकीची प्रतिक्षा असेल. रोहित शर्मा आजच्या सामन्यात खेळणार नसेल तर त्याच्याजागी ख्रिस लीनला संघात स्थान मिळू शकते, असेही म्हटले जात आहे. मुंबई इंडियन्सने आज एक ट्विटरवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ख्रिस सराव करताना दिसत आहे. हे ट्विट आल्यानंतर रोहित शर्माच्या जागी आज मुंबईच्या संघात ख्रिल लीन असणार का? या चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात रोहित खेळणार की नाही, याची उत्सुकता चाहत्यांना सर्वात जास्त असेल. पोलार्डने दिली होती रोहितबाबत माहिती...प्रत्येक सामन्यानंतर दोन्ही संघांचे कर्णधार हे पारितोषिक वितरण समारंभाला येतात. पण रविवारी झालेल्या सामन्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा हा पारितोषिक वितरण समारंभाला आला नाही. रोहितच्याऐवजी पोलार्ड हा पारितोषिक वितरण समारंभाला आला होता. त्यावेळी पोलार्डला रोहितबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी पोलार्ड म्हणाला की, " या सामन्यानंतर रोहित शर्माची तब्येत बिघडली आहे. तो थोडासा आजारी पडला आहे. त्यामुळेच मी पारितोषिक वितरण समारंभाला आलो आहे. पण रोहित लवकरच बरा होईल, अशी आम्हा सर्वांना आशा आहे." गेल्या रविवारी मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील सामना चांगलाच थरारक झाला होता. हा सामना दुसऱ्या सुपर ओव्हरपर्यंत गेला होता. या सामन्यानंतर रोहित शर्मा आजारी असल्याचे समजले होते. त्यानंतर मुंबई इंडियन्सने याबाबत कोणतेही अपडेट्स दिलेले नाहीत. पण आजच्या त्यांच्या एका ट्विटमुळे काहीसा संभ्रम नक्की निर्माण झाला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात रोहित खेळणार की नाही, हे नाणेफेकीच्यावेळीच स्पष्ट होऊ शकेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2IYTz0p
No comments:
Post a Comment