नवी दिल्ली: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड काल करण्यात आली. टीम इंडियाच्या वनडे आणि टी-२० मधून () ला डच्चू देण्यात आला आहे. पंतला वगळण्यावरून माजी क्रिकेटपटू आणि समालोचक यांच्यात आता चर्चा सुरू झाली आहे. काही जण पंतला संघाबाहेर ठेवण्याच्या निर्णयाचे समर्थन करत आहेत. तर आशिष नेहरासह काही माजी खेळाडूंच्या मते पंतला संघात घेतले पाहिजे, असे मते व्यक्त करत आहेत. वाचा- निवड समिती प्रमुख सुनिल जोशींच्या नेतृत्वाखालील नव्या निवड समितीने पंतला संघा बाहेर ठेवण्यामागील त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून पंतला धोनी () चा उत्तराधिकारी मानले जात होते. बीसीसीआयने सार्वजनिकपणे ही गोष्टी सांगितली होती की, पंतच धोनीचा उत्तराधिकारी असेल आणि त्याच्यावर मेहनत घेतली जाईल तसेच पुरेशी संधी दिली जाईल. पण बीसीसीआयने दिलेल्या संधीचा पंतला फायदा घेता आला नाही. परिस्थिती इतकी बिघडली की, त्याला वनडे आणि टी-२० मधून जागा गमवावी लागली. वाचा- या वर्षाच्या सुरुवातीला योगायोगाने केएल राहुलला विकेटकिपर करण्यात आले आणि आता त्याने या जागेवर कब्जा केलाय. राष्ट्रीय निवड समिती पंतच्या वाढत्या वजनामुळे हताश झाले आहेत. याबद्दल समितीने त्याला इशारा देखील दिला होता. वाचा- सुनील जोशीच्या नेतृत्वाखालील समिती पंतच्या वाढत्या वजनावर नाराज आहे. वजन ही पंतची पहिल्यापासूनची अडचण ठरली आहे. एका विकेटकिपरसाठी वाढलेले वजन अडचणीचे ठरू शकते. सध्या देखील आयपीएलमध्ये पंतचे वजन वाढलेले दिसत आहे. वाचा- बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे आणि टी-२० मध्ये गरज पडली तर पंतला संधी मिळू शकते. पण सध्या तरी त्याला फिटनेसवर काम करावे लागणार आहे. दोन्ही संघांत स्थान मिळवण्यासाठी वजन कमी करण्याची गरज आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात काही आवश्यकता भासली तर पंतचा समावेश केला जाऊ शकतो असे समजते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3kx7hpe
No comments:
Post a Comment