शारजा: मुंबई इंडियन्सने आजच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाला भुईसपाट केल्याचेच पाहायला मिळाले. मुंबईने यावेळी दहा विकेट्स राखून चेन्नईच्या संघावर दणदणीत विजय मिळवला. या मोठ्या विजयासह मुंबईच्या संघाने गुणतालिकेत मानाचे स्थान पटकावल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईच्या दमदार विजयानंतर गुणतालिकेत नेमका काय बदल झाला या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा संघ नऊ सामने खेळला होता. या नऊ सामन्यांमध्ये मुंबईच्या संघाने सहा विजय मिळवले होते, तर त्यांना तीन पराभवांचा सामना करावा लागला होता. आजचा त्यांचा दहावा सामना होता. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या दहाव्या सामन्यात मुंबईच्या संघाने मोठा विजय मिळवला. मुंबईने यावेळी दोन गुण तर कमावलेच पण त्याचबरोबर आपाल रनरेटही चांगलाच वाढवला. या गोष्टीचा फायदा मुंबईला झाला असून त्यांनी दिल्ली कॅपिटल्सला धक्का देत गुणतालिकेतील अव्वल स्थान पटकावले आहे. या सामन्यापूर्वी मुंबईचा संघ तिसऱ्या स्थानावर होता. त्यावेळी मुंबईचे १२ गुण होते. पण आजच्या सामन्यातील विजयामुळे मुंबईच्या संघाचे १४ गुण झाले आहेत. सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबी यांचे समान १४ गुण झालेले आहेत. पण चांगल्या रननेटमुळे मुंबईच्या संघाने गुतालिकेत अव्वल स्थान पटावले आहे. त्याचबरोबर दिल्लीच्या संघाची यावेळी दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. त्याचबरोबर आरसीबीचा संघ आता तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. चेन्नई सुपर किंग्सचे या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले आहे. कारण आता यापुढील तिन्ही सामने जरी चेन्नईच्या संघाने जिंकले तरी त्यांना बाद फेरी पोहोचता येणार नाही. त्यामुळे आता त्यांच्यासाठी हे तीन सामने फक्त औपचारीकता असतील. सध्याच्या घडीला चेन्नईचा संघ हा सहा गुणांसह आठव्या स्थानावरच आहे. चेन्नईने आतापर्यंत ११ सामने खेळले आहेत. या ११ सामन्यांपैकी त्यांना फक्त तीनच विजय मिळवता आले आहेत, तर त्यांना आठ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आता चेन्नईचे आव्हान या आयपीएलमधील संपलेले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dSY5sA
No comments:
Post a Comment