Ads

Friday, October 23, 2020

युजवेंद्र चहलच्या होणाऱ्या पत्नीचा दुबईमध्ये भन्नाट डान्स, धनश्रीचा व्हिडीओ झाला व्हायरल

शारजा: मैदानात आरसीबीच्या संघातील युजवेंद चहल हा धमाकेदार कामगिरी करताना दिसत आहे. पण मैदानाबाहेर चहलची होणारी पत्नी धनश्री वर्मा धमाल करताना दिसत आहे. आयपीएल पाहण्यासाठी धनश्री ही युएईमध्ये गेली आहे. पण युएईमध्ये धनश्रीच्या डान्सचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. आयपीएल सुरु होण्यापूर्वी युजवेंद्र आणि धनश्री यांचा साखरपुडा झाला होता. धनश्री ही एक चांगली डान्सर आहे. आतापर्यंत धनश्रीचे काही व्हिडीओ सर्वांनीच पाहिलेले आहेत. पण सध्याचा धनश्रीचा व्हिडीओ हा चांगलाच व्हायरल झाला आहे. बॉलीवूड स्टार अक्षय कुमार आणि किराया अडवाणी यांच्या लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटातील एका गाण्यावर डान्स केला आहे आणि हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतली उतरल्याचे पाहायला मिळत आहे. धनश्री हा दुबईमध्ये वास्तव्याला आहे. आपल्या हॉटेलच्या बाल्कनीमध्ये धनश्रीने हा डान्स केल्याचा पाहायला मिळत आहे. धनश्रीने यावेळी लाल रंगाचा ड्रेस परीधान केला आहे, त्याचबरोबर तिने स्पोर्ट्स शूजही यावेळी वापरले आहेत. या डान्समध्ये धनश्रीने काही नवीन स्टेप्सही केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळेच धनश्रीचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीला उतरल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी धनश्रीने विमानतळावरही एक डान्स केला होता. त्यावेळी तिच्या डान्सचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. पण आता युएईमध्ये आल्यावरही धनश्री शांत बसलेली पाहायला मिळत नाही. कारण धनश्रीने दुबईच्या हॉटेलच्या बाल्कनीमध्ये डान्स केला आहे. या डान्सचा व्हिडीओ धनश्रीनेच आपल्या इंस्टारग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओला चाहत्यांनी बरेच लाइक्स दिले आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. आयपीएलपूर्वी युझवेंद्रनेही काही व्हिडीओ करत ते सोशल मीडियावर अपलोड केले होते. या व्हिडीओंनाही चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला होता. आता चहलची होणारी पत्नी धनश्री ही काही व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहे आणि तिला चाहत्यांचा चांगला प्रतिसादही मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. चाहत्यांनी या व्हिडीओला पसंती दिली आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37zonyR

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...