सिडनी: आंतरराष्ट्रीय परिषद अर्थात आयसीसीद्वारे जाहीर केले जाणारे रँकिंग (ICC Ranking) म्हणजे कचरा आहे, अशा शब्दात इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूने एकूणच परिषदेच्या कारभारावर हल्ला चढवला आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन नेहमची सोशल मीडियावरील वक्तव्यामुळे चर्चेत असतो. आता अशाच एका वक्तव्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयसीसीच्या रँकिंग देण्याच्या कार्यपद्धतीवर वॉन () याने सडकून टीका केली. त्याने इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (New Zealand) या दोन्ही संघांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आयसीसीच्या कसोटी रँकिंगवर हल्ला चढवला. आयसीसीच्या क्रमवारीत सध्या भारत अव्वल स्थानी आहे. त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका, चौथ्यावर इंग्लंड तर पाचव्या स्थानावर ऑस्ट्रेलिया आहे. वाचा- गेल्या दोन वर्षात फार कसोटी सामने न खेळलेले न्यूझीलंड आणि इंग्लंड हे दोन्ही संघ दुसऱ्या आणि चौथ्या स्थानावर कसे काय असू शकतात, असा सवाल वॉनने विचारला. हे दोन्ही संघ दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या लायक नाहीत. अगदी स्पष्टपणे बोलायचे तर आयसीसी क्रमवारी म्हणजे कचरा असल्याचे वॉनने 'सिडनी मॉर्निंग हेरॉल्ड' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. वाचा- गेल्या काही काळात मोजक्या कसोटी मालिका जिंकलेला न्यूझीलंड संघ दुसऱ्या क्रमांकावर कसा काय असू शकतो. तर इंग्लंडचा संघ कसोटी क्रिकेटमध्ये विजयासाठी संघर्ष करत असताना देखील तो चौथ्या स्थानावर आहे. इंग्लंडचा संघ फक्त घरच्या मैदानावर विजय मिळवत आहे. अॅशेस मालिका त्यांना ड्रॉ करता आली. क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या क्रमांकावर हवा होता. पण प्रत्यक्षात ते पाचव्या क्रमांकावर असल्याचे वॉनने सांगितले. भारताचे केले कौतुक माझ्या मते कसोटी क्रिकेटमध्ये दोनच संघ सर्वोत्तम आहेत पहिला भारताचा आणि दुसरा ऑस्ट्रेलियाचा होय. गेल्या १२ वर्षात ऑस्ट्रेलिया संघाला दबावात टाकणारा एकच संघ आहे तो म्हणजे टीम इंडिया. अर्थात भारताने जेव्हा ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. तेव्हा त्यांच्या संघात स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लाबुशेन हे खेळाडू नव्हते. पुढील वर्षी टीम इंडिया जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर येईल तेव्हा गोष्टी बदललेल्या असतील. भारताकडे शानदार जलद गोलंदाजासोबत फिरकीपटू देखील आहेत. हीच त्यांची सर्वात जमेची बाजू असल्याचे वॉनने सांगितले. ऑस्ट्रेलिया संघाला फक्त भारतच आव्हान देऊ शकतो, असे ही तो म्हणाला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2ZnjXVG
No comments:
Post a Comment