Ads

Wednesday, December 25, 2019

'त्या' ४० मिनिटात गांगुलीने हृदय जिंकले: पाक क्रिकेटपटू

नवी दिल्ली: भारतीय संघाचा कर्णधार म्हणून सौरव गांगुलीने शानदार काम केले होते. आता बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून तो पुन्हा तशीच कामगिरी करेल असे, सांगत पाकिस्तानचा माजी फिरकिपटू शकलेन मुश्ताक याने सौरवचे कौतुक केले. इतक नव्हे तर मुश्ताकने सौरवच्या स्वभावाची देखील प्रसंशा केली आहे. पाकिस्तानचा माजी फिरकीपटू शकलेन मुश्ताक () आणि भारताचा माजी कर्णधार () यांनी अनेक सामन्यात एकमेकांविरुद्ध सामने खेळले आहेत. सामना खेळताना असलेली लढाई मैदानाबाहेर कधीच दिसली नाही, असा अनुभव पाकिस्तानच्या या माजी क्रिकेटपटूने सांगितला. काही दिवसांपूर्वी गांगुलीने बीसीसीआयचे अध्यक्षपद () स्विकारले आणि भारतीय क्रिकेटमध्ये अनेक बदल करण्यास सुरुवात केली. गांगुलीच्या या कामाचे मुश्ताकने कौतुक केले. त्याने गांगुलीची नेतृत्व करण्याची क्षमता भन्नाट असल्याचे म्हटले आहे. मुश्ताकने युट्यूबवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये गांगुली हा खेळ पुढे घेऊन जाणार असल्याचे म्हटले आहे. मुश्ताकने गांगुलीसोबतचा एक प्रसंग देखील शेअर केला आहे. काही वर्षांपूर्वी भारत जेव्हा इंग्लंड दौऱ्यावर आला होतो. तेव्हा मी ससेक्सकडून खेळत होते. भारताचा आणि ससेक्स संघाचा तीन दिवसांचा सराव सामना होता. पण गांगुली त्या सामन्यात खेळत नव्हता. २००५-०६मधील ही घटना असावी. माझ्या गुडघ्याचे ऑपरेशन झाले होते आणि मी ३६-३७ आठवडे घरीच होतो. ऑपरेशननंतर मी भारताविरुद्धच्या सराव सामना खेळण्यास आलो. तेव्हा गांगुलीने मला ससेक्स संघाच्या बाल्कनीमध्ये पाहिले. तो ड्रेसिंग रुममध्ये आला आणि मला फॉफी घेण्याची ऑफर दिली. आम्ही दोघे ४० मिनिटे बोलत होतो. या काळात गांगुलीने माझ्या दुखापतीबद्दल आणि कुटुंबीयांबद्दल चौकशी केली. गांगुलीने माझी आस्थेने चौकशी करत माझे हृदय जिंकल्याचे मुश्ताकने सांगितले. पाकिस्तानकडून ४९ कसोटी आणि १६९ वनडे सामन्यात मुश्ताकने अनुक्रमे २०८ आणि २८८ विकेट घेतल्या आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2PUufcX

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...