इस्लामाबाद: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू याने एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. शोएबच्या या गौप्यस्फोटामुळे फक्त पाकिस्तानच नाही तर जागतिक क्रिकेटमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 'रावळपिंडी एक्स्प्रेस' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तरने () पाकिस्तानचा माजी फिरकीपटू () याच्या संदर्भात हा गौप्यस्फोट केला आहे. दानिश हिंदू होता आणि त्यामुळेच पाकिस्तानी संघ त्याला चांगली वागणूक देत नव्हता. पाकिस्तानकडून खेळत असताना त्याच्यासोबत खुप चुकीचे झाले. वाचा- पाकिस्तान संघातील काही खेळाडू तर दानिश सोबत का एकत्र जेवतोस असा प्रश्न विचारत होते, असे शोएबने एका चॅट शोमध्ये सांगितले. दानिशने पाकिस्तानकडून ६१ कसोटीत २६१ तर १८ वनडेत १५ विकेट घेतल्या आहेत. या चॅट शोमध्ये माजी क्रिकेटपटू असीम कमाल आणि राशिद लतीफ सोबत काही खुलासे केले. वाचा- अख्तर म्हणाला, स्टीव्ह वॉ आणि अॅण्डू सायमंडस् यांना वारंवार संधी देण्यात आली. पण आमच्याकडे काही खेळाडूंचे करिअर ड्रेसिंग रुममध्ये खराब केले जाते. युसुफ योहानाने १२ हजार धावा केल्या. पण आम्ही कधी त्याचा सन्मान केला नाही. दानिश कनेरिया हिंदू असल्याच्या मुद्द्यावरून दोघा तिघा खेळाडूंशी माझे वाद झाल्याचे देखील शोएबने सांगितले. ज्याच्याशी संघातील खेळाडू कधी चांगले वागले नाहीत. त्या दानिशने आम्हाला कसोटी मालिका जिंकून दिल्याचे शोएबने सांगितले. जेव्हा मला त्याच्यासोबत का जेवतोस असा प्रश्न विचारला तेव्हा मी रागाने त्यांना उत्तर दिले होते. 'पुन्हा असे बोलला तर तुम्हाला बाहेर फेकून देईन. जो खेळाडू तुम्हाला ६-६ विकेट घेऊन देत आहे. त्याच्याबद्दल तुम्ही असे बोलता', असा जाब शोएबने संबंधित खेळाडूंना विचारल्याचे त्याने सांगितले. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2PURsvs
No comments:
Post a Comment