नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणावाचा परिणाम क्रिकेटवर देखील झाला आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावरून दोन्ही देशातील क्रिकेट बंद आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय पाकिस्तान सोबत फक्त द्विपक्षीय मालिका नाही तर आशियाई संघात देखील खेळण्यास उत्सुक नाही. बांगलादेश क्रिकेट बोर्ड देशाचे संस्थापक शेख मुजीब उर रहमान यांच्या जन्मशताब्दी निमित्त दोन टी-२० सामन्याचे आयोजन करणार आहे. हे सामने आशिया इलेव्हन () विरुद्ध वर्ल्ड इलेव्हन () यांच्यात खेळवले जाणार आहेत. या सामन्याला आयसीसीने अधिकृत दर्जा द्यावा, अशी विनंती 'बीसीबी'ने केली आहे. या सामन्यातील एक संघ आशियातील सर्व देशांच्या खेळाडूंचा असेल. अर्थात यात भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू असतील. पण दोन्ही देशातील संबंध पाहता या सामन्यात कोणत्या तरी एकाच देशातील खेळाडू या संघात खेळतील. हे सामना १८ आणि २२ मार्च २०२० रोजी होणार आहे. वाचा- भारताला पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायचे नाही. त्यामुळेच आशिया इलेव्हन संघात भारतीय खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंसोबत खेळणार सहभागी होणार नाहीत. 'बीसीसीआय'चे संयुक्त सचिव जयेश जॉर्ज यांनी INS या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, भारत आणि पाकचे खेळाडू आशिया संघात एकत्र खेळतील असा हा प्रयत्न आहे. पण प्रत्यक्षात तसे काहीच होणार नाही. कारण पाकिस्तानच्या खेळाडूंना या सामन्यासाठी आमंत्रित केले जाणार नाही. वाचा- या सामन्यासंदर्भात आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आशिया संघात पाकिस्तानचे खेळाडू असणार नाहीत. दोन्ही देश एकत्र येणार नाहीत. त्यामुळे त्यांना एकाची निवड करावी लागेल. आशिया संघाकडून खेळण्यासाठी पाच भारतीय खेळाडूंची निवड बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली करतील, असे जॉर्ज म्हणाले. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने विराट कोहली, महेंद्र सिंह धोनी, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या या खेळाडूंना आशिया संघातून खेळण्यासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती केली आहे. या दोन्ही सामन्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा असेल त्यामुळे खेळाडू गंभीरपणे खेळतील, असे बीसीबीचे अध्यक्ष नजमुल हसन म्हणाले होते. वर्ल्ड इलेव्हन संघाने आतापर्यंत तीन टी-२० सामने खेळले आहेत. तर आशिया इलेव्हन संघाने एकही टी-२० सामना खेळलेला नाही. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34TwXDT
No comments:
Post a Comment