कोलकाता: भारताच्या राष्ट्रीय संघाकडून १३ एकदिवसीय आणि नऊ टी-२० सामने खेळणाऱ्या () या वेगवान गोलंदाजाला बंगालच्या रणजी संघातून बाहेर काढण्यात आले आहे. डिंडाने रणजी सामन्याआधी संघाचे गोलंदाजीच्या प्रशिक्षकांना अपशब्द वापरल्याचा आरोप आहे. प्रथम श्रेणी सामन्यात ४२० विकेट घेणाऱ्या अशोक डिंडाने मंगळवारी बंगाल रणजी संघाचे गोलंदाजीचे कोच () यांना शिवीगाळ केली. या घटनेनंतर बंगाल असोसिएशनने तातडीची बैठक बोलवली आणि डिंडावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. डिंडाला रणजी स्पर्धेतील आंध्र प्रदेशविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी संघातून बाहेर काढण्यात आले आहे. वाचा- डिंडाला संघातून बाहेर काढल्यानंतर बंगाल क्रिकेट असोशिएशनचे सचिवांनी बैठक बोलवली होती. या बैठकीस डिंडा आणि कोच बोस यांना देखील बोलवण्यात आले होते. बैठकीत डिंडाला बोस यांची माफी मागण्यास सांगण्यात आले. पण त्याने माफी मागण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. जर त्याने माफी मागितली असती तर संघातून बाहेर काढले नसते. कारण आंध्र प्रदेशविरुद्ध होणाऱ्या सामन्यात एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते. वाचा- का केली शिवीगाळ मीडिया रिपोर्ट्सनुसार संघाच्या सराव सत्राच्या आधी कोच बोस कोलकाताचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरन याच्याशी बोलत होते. त्यानंतर डिंडाने ड्रेसिंग रुममध्ये बोस यांच्याशी मोठ्याने वाद घातला. डिंडाचा असा समज झाला की बोस त्यांच्यासंदर्भात अभिमन्यूशी बोलत आहेत. पण प्रत्यक्षात अभिमन्यू आणि बोस यांच्यात सामन्यातील रणनितीवर चर्चा सुरु होती. त्यानंतर डिंडाला बोस यांची माफी मागण्यास सांगण्यात आले. त्याने स्पष्ट शब्दात नकार दिला. डिंडा आणि बोस यांच्यात वाद होण्याची ही पहिली घटना नाही. बोस जेव्हा बंगालकडून रणजी खेळत होते तेव्हा डिंडासोबतचे त्यांचे संबंध चांगले नव्हते. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2ZodFoX
No comments:
Post a Comment