ढाका: श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेचे यशस्वी आयोजन केल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आनंद व्यक्त केला होता. देशात पुन्हा एकदा क्रिकेटसाठी सुरक्षित वातावरण असल्याचे सांगत PCBचे प्रमुख एहसान मानी यांनी भारताला टोला देखील मारला होता. पण पाकिस्तानचा हा आनंद फार काळ टिकला नाही. लंका दौरा यशस्वी झाल्यानंतर देखील एका देशाने पाकमध्ये कसोटी मालिका खेळण्यास नकार दिला आहे. श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका यशस्वीपणे पार पाडल्यानंतर पाकिस्तान बोर्डाने बांगलादेशला टेस्ट खेळण्यासाठी बोलवले होते. पण या प्रस्तावाला बांगलादेश क्रिकेट बोर्डाने () ठामपणे नकार दिला. बीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी निजामुद्दीन चौधरी यांनी यासंदर्भात स्पष्ट केले की, आम्ही पाकिस्तानसोबत अन्य ठिकाणी कसोटी सामने खेळू शकतो. बांगलादेश पाकिस्तानमध्ये टी-२० मालिका खेळण्यास तयार आहे. पण कसोटी मालिका खेळण्याचा निर्णय आम्ही घेऊ शकत नाही, चौधरींनी सांगितले. वाचा- आम्ही आमच्या मुद्द्यावर ठाम आहोत. बांगलादेश पाकिस्तानमध्ये टी-२० मालिका खेळू शकते. या मालिकेशी संबंधित व्यक्तींना वाटत नाही की, बांगलादेशने मोठ्या कालावधीचा क्रिकेट सामना पाकिस्तानमध्ये खेळावा. आमच्याकडे याबाबत कोणताही पर्याय नाही. आम्ही टी-२० सामने खेळू शकतो. पण कसोटी खेळायची असेल तर अन्य ठिकाणी सामने खेळवले जावेत, असे चौधरी यांनी एका वृत्तपत्राला सांगितले. पाकिस्तानने बांगलादेशला दोन कसोटी आणि तीन टी-२० सामने खेळण्याचा प्रस्ताव दिला होता. पाक बोर्डाने नुकतेच रावळपिंडी आणि कराची येथे श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामन्याचे यशस्वी आयोजन केले होते. २००९मध्ये श्रीलंकेच्या संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय सामने अन्य ठिकाणी खेळवले जात होते. वाचा- श्रीलंकेचा दौरा यशस्वीपणे पार पडल्यानंतर बांगलादेशने नकार देण्याचे कारण तर्कपूर्ण वाटत नाही, असे पाक बोर्डाने म्हटले आहे. यासंदर्भात आम्ही आयसीसीकडे (ICC) जाणार असल्याचे बोर्डाचे अध्यक्ष मानी यांनी सांगितले. बांगलादेश बोर्ड आमच्या प्रस्तावावर अद्याप विचार करत आहे. त्यांचे अंतिम उत्तर मिळाल्यानंतर यासंदर्भात काय करायचे यावर आम्ही विचार करु असे मानी म्हणाले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Msfg86
No comments:
Post a Comment