नवी दिल्ली: गेल्या काही दशकापासून जागतिक क्रिकेटमधील सर्व प्रकारात स्वत:चा दबदबा निर्माण करणारा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली ()च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवडलेल्या कसोटी संघाचे कर्णधारपद आणि त्यानंतर विस्डेनने निवडलेल्या कसोटी आणि वनडे संघाचे कर्णधारपद विराटला दिले होते. त्यानंतर आता आणखी एक मान विराटला मिळाला आहे. वाचा- जगप्रसिद्ध 'द क्रिकेटर' (The Cricketer) या मासिकाने गेल्या दशकातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू म्हणून विराटची निवड केली आहे. या मासिकाने गेल्या दहा वर्षात सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या ५० क्रिकेटपटूंची यादी तयार केली आहे. या यादीत पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंचा समावेश आहे. विराट कोहलीसह भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (१४वा क्रमांक), वनडे क्रिकेटमध्ये तीन वेळा द्विशतक करणारा रोहित शर्मा (१५वा क्रमांक), भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारा कर्णधार महेंद्र सिंह धोनी (३५वा क्रमांक), अष्टपैलू रविंद्र जडेजा (३६वा क्रमांक) आणि महिला क्रिकेटपटू मिताली राज (४०वा क्रमांक) या खेळाडूंचा समावेश आहे. यामुळे विराट क्रमांक एकवर... विराट बद्दल लिहिताना 'द क्रिकेटर'ने म्हटले आहे की, दशकातील सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून भारताचा कर्णधार विराट कोहलीची एकमताने निवड करण्यात आली. विराटने या दशकात आंतरराष्ट्रीय स्तरावर अन्य कोणत्याही खेळाडूच्यातुलनेत अधिक धावा केल्या आहेत. फलंदाजाच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला दुसऱ्या स्थानावर आहे. वाचा- सचिनने याच दशकात १०० शतकांचा इतिहास घडवला होता. त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. सचिनने २०१३मध्ये १०० शतकांसह निवृत्ती घेतली तेव्हा असे वाटत होते की, त्याच्या विक्रमाशी कोणीही बरोबरी करणार नाही. पण आता विराटने ७० शतके केली आहेत. सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीने त्याच्या ७० शतकांपैकी ६९ शतके २०१० ते २०१९ या काळात झळकावली आहेत. कर्णधार म्हणून त्याने आतापर्यंत १६६ सामने खेळले आहेत. कर्णधापदाची जबाबदारी घेत त्याने सर्वोत्तम फलंदाजी देखील केली आहे. विराटची सरासरी ६६.८८ इतकी असल्याचे 'द क्रिकेटर'ने म्हटले आहे. वाचा- या यादीत जेम्स अॅडरसन, स्टीव्ह स्मिथ, हाशिम आमला, केन व्हिल्यमसन, एबी डिव्हिलियर्स, कुमार संगकारा, डेव्हिड वॉर्नर, डेल स्टेन आणि ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू अॅलिस पॅरी हिचा समावेश आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34UqSH5
No comments:
Post a Comment