मेलबर्न: ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड () यांच्यात ३२ वर्षानंतर बॉक्सिंग डे टेस्ट मॅचला () मेलबर्न येथे सुरुवात झाली आहे. दोन्ही संघातील कसोटी मालिकेतील हा दुसरा सामना आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन व्हिल्यमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर जो बर्न्स याला पहिल्याच ओव्हरमध्ये बोल्ड केले. न्यूझीलंडचा संघ १९८७नंतर प्रथमच बॉक्सिंग डे टेस्ट मॅच खेळत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा व्हिल्यमसनचा निर्णय दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या बोल्टने () योग्य ठरवला. त्याने पहिल्याच षटकात बर्न्सची () विकेट घेतली. बोल्टने हवेतच चेंडू स्विंग केला आणि तो थेट विकेटवर गेला. बोल्टचा चेंडू इतका वेगाने आला आणि स्विंग झाला की बर्न्सला काही समजण्याच्या त्याची विकेट पडली. वाचा- खुद्द बर्न्सला विश्वास बसला नाही की तो बाद झाला आहे. दुखापतीतून बाहेर आलेला बोल्ट इतका शानदार कमबॅक करेल असे कोणालाही वाटले नव्हते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या विकेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. बर्न्स शून्यावर बाद झाल्यानंतर वॉर्नर आणि मार्नस लाबुशेन यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण वॉर्नर ४१ धावांवर बाद झाला. त्यानंतर स्मिथ मैदानावर आला. लाबुशेन ६३ धावा करून बाद झाला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने चार बाद २५७ धावा केल्या होत्या. स्मिथ ७७ धावांवर खेळत आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने २९६ धावांनी जिंकला होता. संबंधित बातम्या-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39naB10
No comments:
Post a Comment