नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय परिषदेने क्रिकेटच्या चाहत्यांना या दशकातील सर्वात आवडता कर्णधाराची निवड करण्यास सांगितले आहे. ICCने ट्विटवरून चाहत्यांना हा प्रश्न विचारला आहे. ICCच्या या प्रश्नावर चाहत्यांनी त्यांची उत्तरे दिली आहे. अधिकतर चाहत्यांनी कर्णधार म्हणून भारतीय खेळाडूची निवड केली आहे. क्रिकेटमधील या दशकातील सर्वात आवडता कर्णधार म्हणून अनेक नेटिझन्सनी भारताचा माजी कर्णधार याची निवड केली आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००७मध्ये टी-२० वर्ल्ड कप, २०११मध्ये वर्ल्ड कप आणि २०१३मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले होते. धोनीने २०१४मध्ये कसोटीचे आणि २०१७मध्ये वनडे क्रिकेटचे कर्णधापद सोडले होते. वाचा- आयसीसीने विचारलेल्या प्रश्नावर अनेक युझर्सनी धोनीची निवड केली आहे. धोनीसोबतच काहींनी विराट सर्वात आवडता कर्णधार असल्याचे म्हटले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली IPLमध्ये चेन्नई सुपर किंग्जने २०१०, २०११ आणि २०१८मध्ये विजेतेपद मिळवले होते. तर चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेचे २०१० आणि २०१४मध्ये विजेतेपद धोनीने मिळवून दिले होते. वाचा- धोनीने वनडेमध्ये १० हजार ७७३ धावा तर विकेटकिपर म्हणून ४४४ गडी बाद केले आहेत. वनडेमधील धोनीची सरासरी ५०.५७ इतकी आहे. यात दहा शतके आणि ७३ अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद १८३ धावा ही त्याची सर्वोच्च खेळी आहे. तर कसोटीमध्ये ४ हजार ८७६ धावासंह २९४ विकेट घेतल्या आहेत. कसोटीत धोनीची सरासरी ३८.०९ इतकी आहे. कसोटीत धोनीने ६ शतके आणि ३३ अर्धशतके केली असून २२४ ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. टी-२० प्रकारात धोनीच्या नावावर १ हजार ६१७ धावा तर ९१ विकेट जमा आहेत. टी-२०मध्ये धोनीने आतापर्यंत ९८ सामने खेळले आहेत. ३७.६०च्या सरासरीने त्याने १ हजार ६१७ धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/350KOIh
No comments:
Post a Comment