मेलबर्न: ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दोन देश एकमेकांचे शेजारी असेल तरी या दोघांच्यात ३२ वर्षानंतर 'बॉक्सिंग डे टेस्ट मॅच' ()होत आहे. दर वेळी प्रमाणे 'बॉक्सिंग डे टेस्ट मॅच' मेलबर्न मैदानावर खेळवला जाणार आहे. अर्थत केवळ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड नाही तर अन्य दोन संघ देखील आहेत ज्यांच्यात बॉक्सिंग डे टेस्ट मॅच होणार आहे. हे दोन संघ म्हणजे दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड होय. 'बॉक्सिंग डे टेस्ट मॅच'ची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की 'बॉक्सिंग डे टेस्ट मॅच' म्हणजे काय? अन्य टेस्ट मॅच आणि 'बॉक्सिंग डे टेस्ट मॅच'मध्ये काय फरक असतो. बॉक्सिंग डे टेस्ट मॅच म्हणजे काय? २५ सप्टेंबर रोजी ख्रिसम (Christmas) साजरा केला जातो. ख्रिमसच्या एक दिवसनंतर सुरु होणाऱ्या कसोटी सामन्याला 'बॉक्सिंग डे टेस्ट मॅच' म्हटले जाते. या 'बॉक्सिंग डे' (Boxing Day) म्हणजे २६ डिसेंबरचा आणि बॉक्सिंग खेळाचा तसा काहीही संबंध नाही. असे मानले जाते की ख्रिसम मोठ्या आनंदात साजरा करण्यासाठी कंपन्या कर्मचाऱ्यांना बॉक्समध्ये मिठाई किंवा अन्य भेट वस्तू देते. यामुळेच २६ डिसेंबरला बॉक्सिंग डे असे म्हटले जाते आणि या दिवशी सुरु होणाऱ्या कसोटी सामन्याला 'बॉक्सिंग डे टेस्ट मॅच' असे म्हटले जाते. वाचा- सर्वसाधारणपणे ख्रिसम आणि नव्या वर्षाच्या निमित्ताने या दिवसात सुट्टी घेतली जाते. अशा वेळी टेस्ट मॅच पाहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या देखील जास्त असते. मेलबर्नमध्ये खेळवली जाते बॉक्सिंग डे टेस्ट ऑस्ट्रेलिया प्रत्येक वर्षी २६ ते ३० डिसेंबर दरम्यान मेलबर्न मैदानावर 'बॉक्सिंग डे टेस्ट मॅच' खेळते. ऑस्ट्रेलियासोबत दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये देखील 'बॉक्सिंग डे टेस्ट मॅच' खेळवली जाते. या वर्षी ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड () यांच्याबरोबर इंग्लंड-दक्षिण आफ्रिका (south africa vs england) यांच्यात 'बॉक्सिंग डे' सामना होत आहे. वाचा- 'बॉक्सिंग डे टेस्ट मॅच'ची सुरुवात इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १९१३मध्ये जोहान्सबर्ग येथे झाली होती. पण त्यानंतर दुसरा 'बॉक्सिंग डे' कसोटी सामना त्यानंतर ४८ वर्षांनी खेळवण्यात आला होता. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाने पहिला 'बॉक्सिंग डे' कसोटी सामना १९६८-६९मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. 'बॉक्सिंग डे' दिवशी कसोटी सामन्याचे आयोजन करण्याची परंपरा १९८१-८२पासून सुरु झाली. ८१-८२पासून प्रत्येक वर्षी एमसीजी अर्थात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर टेस्ट मॅच खेळवली जाऊ लागली. १९६७,१९७२ आणि १९७६ चा अपवाद वगळता सर्व 'बॉक्सिंग डे मॅच' मेलबर्न येथे झाले आहेत. वरील तीन वेळा अॅडलेट येथे झाले होते. १९८०नंतर सर्व 'बॉक्सिंग डे मॅच' मेलबर्नवर झाले आहेत. वाचा- ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील हा दुसरा सामना आहे. पहिल्या सामना पर्थ येथे झाला होता आणि त्यात ऑस्ट्रेलियाने २९६ धावांनी विजय मिळवला होता. या दोन्ही संघादरम्यान १९८७मध्ये 'बॉक्सिंग डे टेस्ट मॅच झाली होती. विशेष म्हणजे न्यूझीलंडच्या विद्यमान संघातील फक्त चार खेळाडूंचा तेव्हा जन्म झाला होता. 'बॉक्सिंग डे टेस्ट मॅच' पाहण्यासाठी ७५ हजार प्रेक्षक येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2PU9mhQ
No comments:
Post a Comment