मुंबई: सुरतमधील लालभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियमवर गुजरात विरुद्ध केरळ यांच्यातील रणजी स्पर्धेतील सामना सुरु झाला आहे. रणजी स्पर्धेतील या सामन्याकडे सर्वांचे लक्ष होते. याचे कारण म्हणजे भारताचा जलद गोलंदाज () या सामन्यात खेळणार होता. पण अखेरच्या क्षणी बुमराह या सामन्यातून बाहेर झाला. चार महिन्यापूर्वी दुखापत झालेल्या बुमराहची श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. लंकेविरुद्ध पाच जानेवारी रोजी होणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्याआधी बुमराहला रणजी सामना खेळण्यास सांगण्यात आले होते. पण बुमराहला स्वत:ला अधिक गोलंदाजी करायची नव्हती. यासंदर्भात तो बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीला () सांगितले होते. त्यानंतर गांगुलीने बुमराहसाठी नियमात बदल करत विश्रांती करण्याची परवानगी दिली. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, केरळविरुद्धच्या रणजी सामन्यात जसप्रीतला खेळायचे होते. पण चार महिन्यानंतर मैदानात पुनरागमन करणाऱ्या जसप्रीतला शरीरावर अधिक भार टाकायचा नव्हता. यामुळेच बुमराहने गांगुलीसोबत चर्चा केली. त्यानंतर गांगुलीने बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्याशी बोलून जसप्रीतला केवळ पांढऱ्या चेंडूवर खेळण्याचा सल्ला दिला. वाचा- बुमराहसाठी गांगुलीने नियमात बदल केल्यामुळे आता तो थेट श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेत खेळेल. बीसीसीआयच्या (BCCI) नियमानुसार कोणताही गोलंदाज दुखापतीनंतर जेव्हा पुन्हा मैदानात पुनरागमन करतो तेव्हा त्याला फिटनेस सिद्ध करावा लागतो. फिटनेस सिद्ध केल्यानंतरच तो भारतीय संघाचा भाग होऊ शकतो. पण गांगुलीने बुमराहसाठी हा नियम बाजूला ठेवत थेट आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची परवानगी दिली. गुजरात संघाला नको होता बुमराह सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघाच्या व्यवस्थापनाकडून बुमराहला एका दिवसात १२ पेक्षा अधिक षटके टाकण्यास देऊ नये, अशी सूचना गुजरात संघाला देण्यात आली होती. गुजरात संघाला असा खेळाडू संघात नको होता जो फक्त १२ षटके टाकेल. यात अखेर गांगुलीने बुमराहला विश्रांती करण्याचा सल्ला दिल्याने तो आत गुजरातकडून खेळणार नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2ER2T11
No comments:
Post a Comment