मेरठ दक्षिण आफ्रिकेत पुढील वर्षी होणाऱ्या अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची सोमवारी घोषणा झाली. या संघाचं नेतृत्व उत्तर प्रदेशचे दोन खेळाहू करणार आहेत. मेरठचा या संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आला आहे. राज्यातल्या खेळाडू मुलाला थेट राष्ट्रीय टीमचा कर्णधार करण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रियमची घरची परिस्थितीही बेताची आहे. वडील नरेश गर्ग टॅक्सी चालवायचे. पण त्यांनी मुलाला स्वप्न पाहण्यापासून आणि ते सत्यात उतरण्यापासून रोखले नाही. प्रियमने स्वत:च्या मेहनतीने हे स्थान पटकावलं आहे. या आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी संघाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी त्याने आपल्या आईला समर्पित केली आहे. 'माझ्या आईचं हे स्वप्न होतं. तिला मला क्रिकेटमध्ये मोठे सामने खेळताना पहायचं होतं,' असं प्रियमने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं. प्रियमच्या आईचं आठ वर्षांपूर्वी निधन झालं. प्रियम उजव्या हाताने खेळणारा फलंदाज आहे. तो यूपीच्या रणजी संघात होता. त्याने वयाच्या आठव्या वर्षीपासून खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याचे आई-वडिल त्याचा खेळाकडे असणारा ओढा पाहून काहिसे चिंतेत होते. त्याने अभ्यासाकडे लक्ष द्यावं असं त्यांना वाटे. टॅक्सी चालवायचे प्रियमचे वडील प्रियमच्या वडिलांनी नरेश गर्ग यांनी सांगितले, 'माझ्याकडे फार साधनं नव्हती. प्रियमचा खेळ पाहून मी त्याला शक्य त्या सर्व सुविधा देण्याचा निर्णय घेतला. आधी मी टॅक्सी चालवायचो, पण काही वर्षांपूर्वी प्रियमची रणजीत निवड झाल्यानंतर परिस्थिती खूप सुधारली.' अंडर १९ विश्वकप: भारतीय संघ यशस्वी जयस्वाल (मुंबई), तिलक वर्मा (हैदराबाद), दिव्यांश सक्सेना (मुंबई), प्रियम गर्ग (कर्णधार, यूपी), ध्रुव चंद जुरेल (उपकर्णधार, विकेटकीपर, यूपी), शाश्वत रावत (बडोदा), दिव्यांश जोशी (मिझोराम), शुभांग हेगडे (कर्नाटक), रवी बिश्नोई (राजस्थान), आकाश सिंह (राजस्थान), कार्तिक त्यागी (यूपी), अथर्व अंकोलेकर (मुंबई), कुमार कुशाग्र (विकेटकीपर, झारखंड), सुशांत मिश्रा (झारखंड), विद्याधर पाटील (कर्नाटक).
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33H5K6O
No comments:
Post a Comment