
मुंबई : युवा सलामीवीर फलंदाज आणि कसोटीपटू यांचा मुंबई रणजी संघाच्या १५ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. दोघेही बडोद्याविरोधात मुंबईचं प्रतिनिधित्व करतील. मिलिंद रेगे यांच्या नेतृत्त्वातील निवड समितीने या दोघांची निवड केली. पण याची अधिकृत घोषणा अजून करण्यात आलेली नाही. मुंबईने देशीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ४१ वेळा विजेता होण्याचा मान मिळवला आहे. यावेळी मुंबई आपला पहिला सामना बडोद्याविरुद्ध खेळणार आहे. ९ डिसेंबरपासून रणजी चषक २०१९-२० मोसमाची सुरुवात होत आहे. अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादवकडे मुंबईचं नेतृत्त्व आहे, तर आदित्य तरे मुंबईचा यष्टीरक्षक असेल. श्रेयस अय्यर आणि अष्टपैलू शिवम दुबे यांचा या संघात समावेश करण्यात आलेला नाही. कसोटी स्पेशालिस्ट अजिंक्य रहाणेला भारतात कसोटी खेळण्याचा मोठा अनुभव आहे, ज्याचा फायदा संघालाही होणार आहे. दोन महिन्यांनंतर भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होईल. दरम्यान, रणजी चषकाच्या निमित्ताने पृथ्वी शॉला पुनरागमनाची मोठी संधी मिळणार आहे. यापूर्वी खोकल्यासाठी प्रतिबंधित औषधाचं अनावधानाने सेवन केल्यामुळे त्याच्यावर ८ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. ही बंदी संपल्यानंतर अर्धशतकी खेळी करत पृथ्वी शॉने पुनरागमन केलं, पण त्याला आता पुन्हा एकदा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावण्यासाठी दमदार खेळी करण्याची आवश्यकता आहे. मुंबईचा संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), आदित्य तरे (उपकर्णधार), अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, जय बिस्सा, शुभम रंजन, आकाश पारकर, सरफराज खान, शम्स मुलानी, विनायक भोईर, शशांक अत्तारडे, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, धवल कुलकर्णी आणि एकनाथ केरकर
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34Mz4Ku
No comments:
Post a Comment