
नवी दिल्ली: नेपाळची अंजली चंद या क्रिकेटपटूने सोमवारी इतिहास रचला. दक्षिण आशियाई गेम्समध्ये महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत अंजलीने एकही धाव न देता ६ विकेट्स खिशात घातल्या! नेपाळमधील पोखरा येथे हा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना सुरू होता. मालदीव महिला टीमविरुद्ध खेळताना अंजलीने हा विक्रम रचला आहे. दक्षिण आशियाई गेम्समध्ये महिला क्रिकेट स्पर्धेतला हा पहिलाच सामना होता. नेपाळने मालदीवच्या महिला संघाला अवघ्या १६ धावांमध्ये अक्षरश: गुंडाळले. नंतर १६ धावांचं इवलंसं आव्हान अवघ्या ५ चेंडूंमध्ये पूर्ण केलं! मालदीवच्या या आव्हानाचा सामना करण्यासाठी मैदानात सलामीला आलेल्या काजल श्रेष्ठने १३ धावा काढल्या आणि तेवढ्या पाच चेंडूत अतिरिक्त चार धावाही मिळाल्या!! अंजलीचा इतिहास अंजलीने इतिहास रचला. तिच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील (पुरुष आणि महिला) सर्वश्रेष्ठ गोलंदाजीची नोंद झाली आहे. यापूर्वी मालदीवच्या मास एलिसाने चीनविरुद्ध ३ धावा देत ६ विकेट्सचा विक्रम रचला होता. हा विक्रम अंजलीने मागे टाकला. पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेत भारतीय गोलंदाज दीपक चहरच्या नावे सर्वश्रेष्ठ गोलंदाजीची नोंद आहे. त्याने याच वर्षी १० नोव्हेंबरला बांगला देशविरुद्ध ७ धावा देऊन सहा विकेट्स घेतले होते. १३ चेंडू, ६ बळी २४ वर्षीय अंजलीने या टी-२० आंतरराष्ट्रीय स्पर्धेत २.१ षटकांची गोलंदाजी केली आणि ६ विकेट घेतले. करुणा भंडारीने ३ विकेट घेतले. अंजलीने तीन फलंदाजांना त्रिफळाचित केलं, एकीला कॅट आऊट केले तर १ स्टम्पिंग केल्याने आऊट झाली. पहिलाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामना विशेष बाब ही की अंजलीचा हा पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना आहे. नेपाळने हा सामना ११५ चेंडू राखून १० गडी राखून जिंकला. अंजली स्वाभाविकपणे प्लेअर ऑफ द मॅच झाली. या स्पर्धेत नेपाळ, मालदीप, बांगलादेश आणि श्रीलंकाचे संघ खेळत आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34GkN1N
No comments:
Post a Comment