Ads

Sunday, December 1, 2019

अंडर १९ वर्ल्डकप: टीम इंडियात तीन मुंबईकर

मुंबई: पुढील वर्षी होणाऱ्या अंडर १९ वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीनं उत्तर प्रदेशच्या प्रियम गर्गकडे संघाचं नेतृत्व सोपवलं आहे. तर या संघात यशस्वी जयस्वाल आणि अथर्व अंकोलेकर आणि दिव्यांश सक्सेना या तीन मुंबईकर खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. भारतीय संघासमोर विश्वविजेतेपद कायम राखण्याचं आव्हान आहे. दक्षिण आफ्रिकेत पुढील वर्षी १७ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेसाठी अखिल भारतीय कनिष्ठ निवड समितीनं आज संघाची घोषणा केली. १६ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. चार गटांत ही स्पर्धा होईल. भारतीय संघाचं नेतृत्व प्रियम गर्गकडे सोपवण्यात आलं आहे. या संघात मुंबईच्या यशस्वी जयस्वाल, अथर्व अंकोलेकर आणि दिव्यांश सक्सेना यांना संधी दिली आहे. भारतीय संघ अ गटात खेळणार आहे. त्यात पहिल्यांदा पात्र ठरलेल्या जपानसह न्यूझीलंड, श्रीलंका या संघांचा समावेश आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर लीग फेरीसाठी पात्र ठरतील. भारतीय संघानं चार वेळा अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. २०१८मध्ये अंडर १९ वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत भारतानं ऑस्ट्रेलियावर आठ विकेट राखून विजय मिळवला होता. या स्पर्धेत भारतीय संघ अजिंक्य ठरला होता. प्रियम गर्गकडे धुरा निवड समितीनं भारतीय संघाची धुरा १९ वर्षीय प्रियम गर्गकडे सोपवली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यानं द्विशतक आणि शतक झळकावलं आहे. भारत क संघाचं त्यानं प्रतिनिधीत्व केलं आहे. हा संघ देवधर करंडक स्पर्धेचा उपविजेता ठरला होता. गेल्या गेल्याच महिन्यात भारत ब संघाविरुद्ध अंतिम सामन्यात ७४ धावांची तुफानी खेळी केली होती. अंडर १९ विश्वकप: भारतीय संघ यशस्वी जयस्वाल (मुंबई), तिलक वर्मा (हैदराबाद), दिव्यांश सक्सेना (मुंबई), प्रियम गर्ग (कर्णधार, यूपी), ध्रुव चंद जुरेल (उपकर्णधार, विकेटकीपर, यूपी), शाश्वत रावत (बडोदा), दिव्यांश जोशी (मिझोराम), शुभांग हेगडे (कर्नाटक), रवी बिश्नोई (राजस्थान), आकाश सिंह (राजस्थान), कार्तिक त्यागी (यूपी), अथर्व अंकोलेकर (मुंबई), कुमार कुशाग्र (विकेटकीपर, झारखंड), सुशांत मिश्रा (झारखंड), विद्याधर पाटील (कर्नाटक).


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33FharJ

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...