
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर गेला आहे. त्यामुळं 'तो सध्या काय करतो?' असा प्रश्न अवघ्या क्रिकेट जगताला आणि चाहत्यांना पडला आहे. पण तो क्रिकेटच्या मैदानात कधी परतणार याचं उत्तर त्याच्याशिवाय कुणाकडेच नाही. बीसीसीआयचे अध्यक्ष यांनाही धोनीच्या पुनरागमनासंबंधी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कृपया तुम्ही त्यालाच विचारा, असं उत्तर गांगुलीनं दिलं. इंग्लंडमध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकपमधील सेमिफायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. तेव्हापासून महेंद्रसिंग धोनीही क्रिकेटपासून दूर गेला आहे. त्यानंतर वेस्ट इंडीज दौरा, दक्षिण आफ्रिकाविरुद्धची मालिका आणि बांगलादेशविरुद्ध मायदेशात झालेल्या मालिकेत तो खेळला नाही. धोनी कुठे आहे? तो कधी 'कमबॅक' करणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. मुंबईत बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्यानंतर सौरव गांगुली यांना पत्रकार परिषदेत धोनीच्या पुनरागमनाविषयी प्रश्न विचारण्यात आला. 'महेंद्रसिंग धोनी पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमध्ये सहभागी होणार का?' असा प्रश्न गांगुली यांना विचारण्यात आला. त्यावर याबाबत कृपया तुम्ही धोनीलाच विचारा, असं उत्तर गांगुली यांनी दिलं. अलीकडेच धोनी हा एका कार्यक्रमानिमित्त मुंबईत आला होता. त्यावेळी त्याला वापसी कधी करणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, जानेवारीपर्यंत काहीही विचारू नका, असं तो म्हणाला होता. महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात कधी पुनरागमन करणार? धोनी क्रिकेटमधून संन्यास घेणार आहे का? याबाबत क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यावर धोनीनेच पडदा टाकला. संघात पुनरागमन कधी करायचं हे जानेवारीनंतर बघू, असं धोनीनं म्हटलं होतं. त्यामुळे धोनी तुर्तास तरी संन्यास घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचं स्पष्ट होत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2DznrKC
No comments:
Post a Comment