नवी दिल्ली: पाकिस्तानमध्ये श्रीलंकेचा दौरा यशस्वीपणे झाल्यानंतर भारतातल्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या एहसान मानी यांना बीसीसीआयने ( ) सडेतोड उत्तर दिले आहे. भारतीय नियामक मंडळाचे उपाध्यक्ष महिम वर्मा () यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे () अध्यक्ष मानी यांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर दिले आहे. 'पाकिस्तान हा सुरक्षित देश आहे हे आम्ही दाखवून दिले आहे. सध्या तर भारतातच पाकिस्तानपेक्षा सुरक्षेच्या बाबतीत अधिक धोका आहे. श्रीलंकेच्या यशस्वी दौऱ्यानंतर तर पाकिस्तानातील सुरक्षेबाबत कुणीही प्रश्न उपस्थित करू शकणार नाही', असे मानी () म्हणाले होते. ANI वृत्तसंस्थेशी बोलताना वर्मा म्हणाले, मानी यांना प्रथम स्वत:च्या देशाकडे पहावे. आमच्या देशाची सुरक्षा करण्यास आम्ही सक्षम आहोत. वाचा- भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध तणावाचे असल्याने त्याचे परिणाम क्रिकेटवर देखील झाले आहेत. दोन्ही संघ द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत. हे दोन्ही संघ फक्त आयसीसीद्वारे आयोजित स्पर्धेतच क्रिकेटचे सामने खेळतात. काय म्हणाले होते मानी 'आम्ही हे सिद्ध करुन दाखवले आहे की पाकिस्तान सुरक्षित आहे. जर एखाद संघ पाकिस्तानमध्ये येण्यास तयार नसले तर त्यांनी हे सिद्ध करुन दाखवावे की पाकिस्तान असुरक्षित आहे. आजच्या परिस्थितीत पाकिस्तानच्या तुलनेत भारतात अधिक धोका आहे', असे मानी म्हणाले होते. श्रीलंकेचा संघ नुकताच पाकिस्तान दौऱ्यावर आला होता. हा दौरा यशस्वीपणे पार पाडल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले होते. वाचा- श्रीलंकेच्या संघावर २००९मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर दहा वर्षांनी पाकिस्तानच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना झाला. दहशवादी हल्ल्यानंतर जगातील सर्वच देशांनी पाकमध्ये खेळण्यास नकार दिला होता. बांगलादेशचा नकार पाकिस्तानने घरच्या मैदानावर श्रीलंकेचा दौरा यशस्वी करून दाखवला असला तरी तेथील सुरक्षितेतेसंदर्भात अद्याप विश्वास निर्माण झालेला दिसत नाही. पाकिस्तानला आता जानेवारी महिन्यात तीन टी-२०, दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. यासाठी बांगलादेशच्या संघाला ते बोलवत आहेत. पण बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षेचे कारण देऊन पाच दिवसांचा सामना खेळू शकत नाही असे म्हटले आहे. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2PSfXcD
No comments:
Post a Comment