Ads

Friday, January 3, 2020

ननकाना हल्ला: भज्जीची इम्रान खान यांच्याकडे तक्रार

नवी दिल्ली: पाकिस्तानातील शीख धर्मियांचे पवित्र स्थळ असलेल्या ननकाना साहिब गुरुद्वारावर शुक्रवारी झालेला हल्ला आणि शीख समाजाला दिलेली धमकीच्या प्रकरणात भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. क्रिकेटपटू हरभजन सिंह यानेही गुरुद्वारावर झालेल्या हल्ल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याने एक व्हिडिओ ट्विट करत या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. या व्हिडिओसाठी हरभजनने पाकिस्तानचे पंतप्रधान यांना टॅग केले आहे. मोहम्मद हसन नावाची एक व्यक्ती पाकिस्तानी मुस्लिमांना ननकाना साहिबमध्ये राहणाऱ्या शीखांविरुद्ध भडकवत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. ही व्यक्ती तेथे राहणाऱ्या शीख समाजाच्या लोकांना देशोधडीला लावण्याबाबत बोलताना व्हिडिओत दिसत आहे. तसेच इथे असलेला गुरुद्वाराही उद्ध्वस्त करण्याविषयी देखील ही व्यक्ती आवाहन करत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. हरभजन सिंग याने हा व्हिडिओ ट्विट करत म्हटले आहे की, 'कळत नाही की काही लोकांना काय झालंय, त्यांना शांतीने का राहवत नाही, माहीत नाही.... मोहम्मद हसन ही व्यक्ती उद्ध्वस्त करून त्या जागेवर मशीद बांधण्याबाबत बोलत आहे. हे अतिशय दु:खद आहे.'



from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2sKWtxZ

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...