वेलिंग्टन: न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात थरारक विजय मिळवून भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आज होणाऱ्या चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय संघात बदल अपेक्षित आहेत. न्यूझीलंड भूमीवर मिळवलेल्या पहिल्या मालिका विजयानंतर भारतीय संघाला अखेरच्या दोन सामन्यात प्रयोगाला वाव आहे. दोन्ही संघातील चौथा सामना वेलिंग्टन येथील वेस्टपॅक मैदानावर होत होणार आहे. तिसऱ्या सामन्यानंतर विराटने देखील बदलाचे संकेत दिले होते. त्यामुळे भारतीय संघात नव्या खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे. यात आणि अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर यांना संधी मिळू शकते. भारतीय संघातील सलामीवीरांचा विचार केल्यास चौथ्या सामन्यात रोहित शर्मा आणि केएल राहुल हेच डावाची सुरूवात करतील. राहुलने फलंदाज आणि विकेटकीपर म्हणून देखील छाप पाडली आहे. मधल्या फळीचा विचार केल्यास कर्णधार , श्रेयस अय्यर आणि मनीष पांडे हेच असतील. वाचा- आता संघातील अष्टपैलू खेळाडूचा विचार केल्यास रविंद्र जडेजा ऐवजी वॉशिंग्टन सुंदर याला संधी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय शिवम दुबे आहे जो संघात अष्टपैलू म्हणून भूमिका पार पाडत आहे. चौथ्या सामन्यात सैनीला संधी मिळू शकते. सैनीला पहिल्या तिनही सामन्यात संधी मिळाली नव्हती. शार्दुल ठाकूरला विश्रींती देऊन सैनीचा संघात समावेश होऊ शकतो. हे देखील वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Uabjcz
No comments:
Post a Comment