वेलिंग्टन: भारताविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने ३-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. या उलट न्यूझीलंडचा संघ मात्र प्रतिष्ठा जपण्यासाठी खेळेल. गेल्या वर्षी याच मैदानावर झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ८० धावांनी पराभव केला होता. या सामन्यात भारताविरुद्ध झालेल्या दोन सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला आहे. त्यामुळे भारतीय संघ या मैदानावरील इतिहास बदलण्यास उत्सुक असेल. Live अपडेट >> भारतीय संघात तीन बदल- संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनी यांना संघात स्थान; तर रोहित शर्मा, रविंद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती >> न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय >> चौथ्या टी-२० सामन्याआधी न्यूझीलंडला मोठा धक्का, कर्णधार केन विल्यम्सन दुखापतीमुळे खेळणार नाही
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Oeh05r
No comments:
Post a Comment