हॅमिल्टन: न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा हिटमॅन रोहित शर्माला एक खास विक्रम स्वत:च्या नावावर केला. सेडन पार्कवर झालेल्या २३ चेंडूत ५० धावांची धमाकेदार खेळी केली. या अर्धशतकासह त्याने क्रिकेटमधील एक विक्रम केला. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात रोहितने ७ तर दुसऱ्या सामन्यात त्याने ८ धावा केल्या होत्या. दोन्ही सामन्यात मोठी धावसंख्या करण्यास अपयशी ठरलेल्या रोहितने तिसऱ्या सामन्यात २३ चेंडूत ३ षटकार आणि ५ चौकारांसह अर्धशतक केले. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून त्याच्या १० हजार धावा पूर्ण झाल्या. रोहितच्या आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी आतापर्यंत फक्त तिघा भारतीय क्रिकेटपटूंनी केली होती. भारताकडून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आणि विरेंद्र सेहवाग यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून १० हजार धावा केल्या आहेत. गावस्कर यांनी ओपनर म्हणून १२ हजार २५८, विरेंद्र सेहवागने १६ हजार ११९ तर सचिन तेंडुलकरने १५ हजार ३१० धावा केल्या आहेत. रोहितने आतापर्यंत ३६१ आंतरराष्ट्रीय सामन्यात १३ हजार ८९६ धावा केल्या आहेत. त्यात ३९ शतके आणि ७२ अर्धशतकांचा समावेश आहे. रोहितने २१९ सामन्यात ओपनर म्हणून ९ हजार ९४४ धावा केल्या आहेत. टी-२०चा विचार केल्यास १०५ टी-२० सामन्यात त्याने ४ शतक आणि १९ अर्धशतकांसह २ हजार ६४० धावा केल्या आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2U4njfR
No comments:
Post a Comment