वेलिंग्टन: मनीष पांडेच्या झुंजार अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारताने २० षटकात ८ बाद १६५ धावा केल्या. भारताकडून मनिष पांडे याने सर्वाधिक नाबाद ५० धावा केल्या. पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाने या सामन्यात तीन बदल केलेत. तर दुखापतीमुळे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन देखील या सामन्याला मुकला आहे. विल्यम्सनच्या जागी संघाचे नेतृत्व करणाऱ्या टिम साऊदीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने मालिकेत प्रथमच बदल केला. भारताने रोहित शर्मा, रविंद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती दिली. या तिघांच्या बदली संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनी यांना संधी दिली. वाचा- साऊदीचा निर्णय न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. दुसऱ्याच षटकात संजू ८ धावाकरून बाद झाला. त्याच्या जागी आलेला विराट कोहली ११ धावांवर माघारी परतला. तर श्रेयस अय्यर देखील एक धाव करून बाद झाला. आघाडीचे तीन फलंदाज बाद झाल्यामुळे भारताची अवस्था ३ बाद ५२ अशी झाली होती. त्यानंतर राहुलने धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी नियमित अंतराने विकेट घेतल्याने भारतीय फलंदाजांना मोठी भागिदारी उभी करता आली नाही. वाचा- भारताकडून मनिष पांडेने नाबाद ५०, तर राहुलने ३९ धावा केल्या. न्यूझीलंडकडून ईश सोधीने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2U7OxCi
No comments:
Post a Comment