वृत्तसंस्था, नवी मुंबई ‘जगासमोर उघडे पडायचे नसेल, तर कधीही शॉर्ट कटचा अवलंब करू नका,’ असा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नवोदित क्रिकेटपटूंना दिला आहे. स्वत:चे उदाहरण देताना सचिन म्हणाला, ‘आयुष्यात खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. मी नेहमीच शिस्त, एकाग्रता, योजना, त्यांची अंमलबजावणी याबाबत सतत बोलत असतो. मात्र, अनेकदा माझ्याकडून अपेक्षेप्रमाणे खेळ झालेला नाही. मी अपयशीही ठरलो आहे. मात्र, खेळ आणि माझ्या संघाकडून मी पुन्हा माझ्या पायावर उभा राहू शकलो. अर्थात, यासाठी मी कधीही शॉर्ट कटचा अवलंब केला नाही. लांब पल्ला गाठताना अनेक अडचणी येतात. मात्र, प्रामाणिकपणे तुम्ही त्यांचा सामना केला, तर जगासमोर तुमची चूक कधीच येणार नाही.’ एका कार्यक्रमात मुलांना मार्गदर्शन करताना इंग्लंडचे माजी कर्णधार माइक गटिंग, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील उपस्थित होते. दरम्यान गटिंग यांनी चारदिवसीय कसोटी क्रिकेटला विरोध केला. ते म्हणाले, ‘टेस्ट क्रिकेट हे युनिक आहे. जे कधीच क्रिकेट खेळले नाहीत, असे व्यवस्थापक हा निर्णय घेत आहेत, हे दुर्दैवी आहे. त्यांना केवळ वेळापत्रकाची समस्या दिसते आहे. त्यामुळे ज्यांना या कसोटी क्रिकेटचे महत्त्व कळते, त्यांच्याशी चर्चा करायला हवी.’
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36DKUGK
No comments:
Post a Comment