बेनोनी: भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्याची सुरूवात होण्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने न्यूझीलंडच्या संघाला सुसंस्कृत लोकांचा संघ असल्याचे म्हटले होते. अर्थात हे फक्त न्यूझीलंडच्या मुख्य संघाला लागू होत नाही तर त्यांचा १९ वर्षाखालील संघ देखील असाच आहे. असे म्हणण्याला कारण ठरले आहे दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या आयसीसी १९ वर्षाखालील वर्ल्ड कपमधील एका घटनेमुळे... खेळ कोणताही असो त्यात जय-पराजयापेक्षा खेळ भावना महत्त्वाची असते. १९ वर्षाखालील आयसीसी वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात विडिंजचा फलंदाज किक्र मॅकेंजी ९९ धावांवर खेळत असताना दुखापतग्रस्त झाला. तेव्हा वेस्ट इंडिजने २०५ धावा केल्या होत्या. त्यानंतर तो पुन्हा शेवटचा फलंदाज म्हणून मैदानावर खेळण्यास आला. पण किक्रला शतक पूर्ण करता आले नाही. तो ९९ धावांवर बाद झाला. पायाला दुखापत झाल्यामुळे किक्रला चालता येत नव्हते. तेव्हा न्यूझीलंडच्या खेळाडूंनी त्याला उचलून घेतले आणि ड्रेसिंग रूमपर्यंत नेले. वाचा- या सामन्यात किक्रने १०४ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांसह ९९ धावा केल्या. पण न्यूझीलंडने हे लक्ष्य पार करत उपांत्य पूर्व फेरीत स्थान मिळवले. वाचा- आयसीसीच्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या ट्विटवर या घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हाच व्हिडिओ भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील शेअर केला आहे. क्रिकेटमधील वैयक्तीक भावना माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे. न्यूझीलंडच्या १९ वर्षाखालील संघाच्या या कृतीने माझे मन जिंकले, असे सचिनने म्हटले आहे. सचिनच्या आधी भारताचा हिटमॅन रोहित शर्माने देखील आयसीसीचा हा व्हिडिओ शेअर केला. खेळ भावना सर्वात वर असल्याचे पाहून छान वाटले, असे रोहितने म्हटले आहे. १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेत बुधवारी झालेल्या उपांत्य पूर्व फेरीत वेस्ट इंडिजच्या संघाने २३८ धावा केल्या. विजयाचे हे लक्ष्य न्यूझीलंडने ८ विकेटच्या बदल्यात पार केले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2RK2ODm
No comments:
Post a Comment