हॅमिल्टन: जगातील सर्वच संघ सध्या ऑस्ट्रेलियात होणाऱ्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आयसीसी टी-२० वर्ल्ड कपची तयारी करत आहेत. भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे आणि टी-२० मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना उद्या होत आहे. या सामन्याआधी भारतीय संघाचे फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी आगामी वर्ल्ड कप संदर्भात एक मोठी घोषणा केली. भारतीय क्रिकेटमधील नव्या पिढीची कामगिरी अविश्वसनीय अशी आहे. आगामी आयसीसी टी-२० वर्ल्ड कपसाठी महत्त्वाच्या खेळाडूंची निवड जवळपास झाल्याचे राठोड यांनी न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्याआधी सांगितले. संघ निवडीची प्रक्रिया अखेरच्या क्षणापर्यंत सुरू असलेच. पण माझे आणि संघ व्यवस्थापनाची चर्चा झाली आहे. आम्ही महत्त्वाच्या खेळाडूंची निवड केली आहे. टी-२० वर्ल्ड कपसाठी संघ कसा हवा हे आम्हाला माहित आहे. दुखापत किंवा अत्यंत खराब फार्म या दोन गोष्टी वगळता मला वाटत नाही संघात फार मोठे बदल होणार नाहीत, असे राठोड यांनी स्पष्ट केले. वाचा- ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर भारताने गेल्या सप्टेंबरपासून संघात प्रयोग करण्यास सुरूवात केली होती. त्यात श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर आणि शिवम दुबे या सारख्या खेळाडूंना संधी देण्यात आली. भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये चांगली कामगिरी करत आहे. सर्व खेळाडूंनी संघाच्या यशात महत्त्वाचे योगदान दिले आहे. वाचा- भारतीय संघातील नवी पिढी अविश्वसनीय आहे. ते पटकन परिस्थितीशी जुळवून घेतात. नवा खेळ, नवे मैदान आणि नव्या देशात देखील ते सर्वोत्तम कामगिरी करत आहेत. न्यूझीलंडमध्ये अगदी कमी वेळेत खेळाडूंनी स्वत:ला जुळवून घेतल्याचे राठोड यांनी सांगितले. राहुल आणि अय्यरचे कौतुक न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही सामन्यात केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी शानदार कामगिरी केली. दोन्ही सामन्यातील विजयात दोघांची महत्त्वाची भूमिका होती. या खेळाडूंना अधिक संधी मिळाली तर ते सामना जिंकून देतात त्याच बरोबर त्यांचा आत्मविश्वास देखील वाढतो, असे राठोड म्हणाले. ऑकलंडच्या तुलनेत हॅमिल्टन, वेलिंग्टन आणि माउंट मानगानुई येथील मैदान मोठे आहेत. पण असे असले तरी भारतीय संघात बदल होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. हे देखील वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2GsTH3H
No comments:
Post a Comment