हॅमिल्टन: तिसऱ्या टी-२० सामन्यात सलामीवीर रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडला १८० धावांचे आव्हान दिले. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने २० षटकात ५ बाद २७९ धावा केल्या. तिसऱ्या टी-२०त न्यूझीलंडने भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी ८९ धावांची शानदार सुरूवात करून दिली. पहिल्या दोन सामन्यात अर्धशतकी खेळी करणारा राहुल २७ धावांवर बाद झाला. त्यानंतर दरम्यान रोहितने टी-२०मधील अर्धशतक पूर्ण केले. पण राहुल पाठोपाठ रोहित देखील बाद झाला. त्याने ४० चेंडूत ३ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ६५ धावा केल्या. रोहित बाद झाल्यानंतर प्रमोशन मिळालेल्या शिवम दुबेने निराशा केली. तो पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद झाला. यामुळे भारताची अवस्था ३ बाद ९६ अशी झाली. वाचा- दुबेच्या जागी आलेल्या श्रेयस अय्यर आणि विराट यांनी धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. श्रेयसला या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. तो १७ धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट देखील ३८ धावा करून माघारी परतला. अखेरच्या षटकांत मनिष पांडे आणि रविंद्र जडेजा यांनी ११ चेंडूत २४ धावा केल्या. यामुळे भारताला १७९ धावांपर्यंत मजल मारता आली. वाचा- न्यूझीलंडकडून हॅमिश बेनेटने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. मिशेल सँटनर आणि कॉलिन डी ग्रँडहोम यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. हे देखील वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36wzK6x
No comments:
Post a Comment